Share

आमदारांपेक्षा बीडकरांचा बैठकीत ‘रुबाब’, संतापलेल्या धंगेकरांचा थेट चंद्रकांत पाटलांसमोरच रूद्रावतार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandkant Patil) यांची पुण्यात (Pune) एक बैठक पार पडली. या बैठकी संदर्भात पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर ((Ravindra Dhangekar) यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

रवींद्र धंगेकर यांनी चालू बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे सध्या ही बैठक चर्चेचा विषय ठरत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत आमदारांपेक्षा भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते. या कारणास्तव आमदार रवींद्र धंगेकर चालू बैठकीतून उठून गेले असल्याचे बोलले जाते आहे.

यात भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी गणेश बिडकर हेच जास्त बोलत असल्याचे कारण देत आमदार धंगेकर हे बैठकीतून निघून गेले. चंद्रकांत पाटील यांनी ‘हू इज धंगेकर’ असा प्रश्न निवडणूक प्रचार सभेत विचारला होता. त्यावेळी धंगेकर निवडणूक निवडून आल्यानंतर चंदकांत पाटील यांचा समाचार घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती.

यावर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, बैठक सुरू झाल्यावर पालकमंत्र्यांनी माझ्याकड पहिलेच नाही. बैठकीत पुण्यातील रस्ते आणि वाहतुकीबद्दल चर्चा सुरू होती. तेव्हा अचानक गणेश बिडकर तिथ आले. आजच्या बैठकीला त्यांना निमंत्रण नव्हत. पण त्यांना भाजपची बैठक घ्यायची होती, नागरिकांमध्ये खुलेआम चर्चा करायला पाहिजे होती.

या सर्व प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केल. ते म्हणाले, बैठकीत धंगेकर यांनी नाराजी व्यक्त करायला हवी होती, त्यांनी विचारायला हवं होतं हे बिडकर कोण? मी निषेध म्हणून बैठकीतून चाललोय, अस तरी म्हणायचं होतं. म्हणजे मी त्यांना म्हणलो असतो अहो धंगेकर कुठे चाललाय बसा इथे.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, मला वाटलं की धंगेकर यांना फोन आला आहे. म्हणून ते बाहेर गेले आहेत. बराच वेळ न आल्यानंतर मी धंगेकर कुठे गेले आहेत असे विचारलं. तेव्हा ही ते नाराज असल्याचे मला कोणी सांगितलं नाही. नाहीतर मी फोन करून त्यांना बोलावून घेतलं असतं. रात गई बात गई…. आता ते आमदार झालेत. लोकप्रतिनिधी झालेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

म्हत्वाच्या बातम्या –

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now