राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यामध्ये कायम शाब्दिक चकमक पाहायला मिळते. दोघेही एकमेकांवर कायम टीका करत असतात. पडळकरांनी पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
अशातच अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केल्याने गोपीचंद पडळकर यांच्यावर ‘हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा’ अशी ट्विट करत खोचक टीका केली आहे. यादरम्यान हर्षवर्धन पाटलांना बारामतीमधून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे तिकीट मिळवण्याचा अप्रत्यक्ष उल्लेखही त्यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत झालेल्या सभेत बोलत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वादंग पेटले आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोओप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या रंगल्या आहेत.
अमोल मिटकरी ट्विट करत म्हटले की, गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे. पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा.याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही. हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल, अश्या खोचक शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार यांना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी लावासा, मगरपट्टा, आणि बारामती असे महाराष्ट्राचे तीन राज्य करा. मगरपट्ट्याचे मुख्यमंत्री जयंत पाटील यांना करा. तर लवासाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळे आणि बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवार यांना करा. या तिन्ही राज्यांना एकत्रित करून देश बनवा आणि त्या देशाचे पंतप्रधान शरद पवार यांना करा, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.
तसेच, शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रासह देशात अनेक वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती. परंतु त्यांनी राज्यातील दुष्काळी भागात कधीही पाणी पोहोचवण्याचे काम केले नाही. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांना राज्यात पैसा आणावासा वाटला नाही. त्यामुळे शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून ती लवकर काढून टाकायला हवी, असं वक्तव्य पडवळकर यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या
अंधारे सगळ्यांना माझा भाऊ म्हणतात पण त्या बाईने काय काय लफडी केली…; शिंदेगटाने आता सगळंच काढलं
मेहुण्याची चौकशी बंद करण्यासाठीच ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला; समोर आला मोठा गौप्यस्फोट
हरमनचे हास्य, अंबानींची गर्जना, झुलनची मिठी, WPL जिंकल्यानंतरचा मुंबईचा सेलिब्रेशन Video Viral