Smriti Irani: प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात जे आठवले तरी डोळ्यात अश्रू येतात. स्मृती इराणी यांनी तिच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस आठवले. जे ऐकून तुमचेही डोळे भरून येतील. स्मृती इराणी यांनी रडत रडत संघर्षाचे दिवस कसे पार केले हे सांगितले. स्मृती इराणींनी मुंबईत असे दिवस पाहिले आहेत की ज्याची स्वप्नातही कल्पना नाही.
जेव्हा अभिनेत्री स्मृती इराणी टीव्हीवर तुलसी विराणीच्या भूमिकेत दिसली तेव्हा तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. ‘कभी सास भी कभी बहू थी’ या टीव्ही सीरियल आजही प्रत्येक घराघरात पाहायला लोकांना आवडते. जेव्हा ही टीव्ही सीरियल आठवते तेव्हा स्मृती इराणींचा चेहरा सर्वात आधी समोर येतो. त्या काळात प्रत्येक घरातील प्रत्येकाला स्मृती इराणींसारख्या सुसंस्कृत सुनेची स्वप्ने पडायची.
एकता कपूरचा लोकप्रिय शो ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ ने यशाचे अनेक झेंडे रोवले. या शोने स्मृती इराणींना देशाची तुळशीची पदवी दिली. या शोमध्ये स्मृती इराणी यांनी लोकांच्या मनावर खोलवर छाप सोडली. पण त्याचा खऱ्या आयुष्यातला प्रवास अजिबात सोपा नव्हता. मेहनत करून त्यांनी यश संपादन केले आहे. आता त्या केंद्रीय मंत्री आहेत.
स्मृती इराणी यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देताना माध्यमांशी बोलताना सांगितले की, एक काळ असा होता की, त्या मुंबईतील मॅकडोनाल्डच्या दुकानात क्लिनर म्हणून काम करत होता. ज्यासाठी त्याला महिन्याला १५०० रुपये मिळायचे. एक काळ असा होता की स्मृती इराणींना आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःच्या कुटुंबियांसमोर संघर्ष करावा लागला.
स्मृती इराणी यांची सुरुवातीपासूनच मोठी स्वप्ने होती. त्यामुळे जेव्हा त्यांना मिस इंडिया स्पर्धकासाठी १ लाख रुपयांची गरज होती. त्यानंतर त्यांनी वडिलांकडून एक लाखाची रक्कम कर्ज म्हणून घेतली होती. मात्र वडिलांनी पैसे देताना स्मृतीसमोर एक अट ठेवली होती. तिला व्याजासह एक लाख रुपये परत करावे लागतील, अशी अट होती.
माध्यमांशी बोलताना स्मृती म्हणाली की, मी ही अट पुर्ण करू शकले नाही. तर माझे वडील दाखवतील त्या मुलाशी मला लग्न करावे लागणार होते. त्यावेळी स्मृतींनी ही अट मान्य केली होती. पण हे पैसे फेडण्यासाठी त्यांना आणखी संघर्ष करावा लागला. स्मृतीने सौंदर्य स्पर्धा जिंकताच तिने जिंकलेली ६० हजारांची रक्कम लगेच तिच्या वडिलांना परत केली. यानंतर संपूर्ण राहिलेले पैसे देण्यासाठी स्मृती मुंबईतील मॅकडोनाल्डमध्ये क्लिनर म्हणून काम करत होत्या.
महत्वाच्या बातम्या
आशिया चषक 2023 चे वेळापत्रक जाहीर; 18 एप्रिलपासून ‘या’ देशात सुरू होणार सामने
महाराष्ट्रात लागला नवीन किल्ल्याचा शोध; बांधकामाचे अवशेष सापडले; सॅटेलाइट इमेजही निघाल्या