कपडे बदलतानाच्या व्हिडीओनंतर गौतमीने पहील्यांदाच केले मन मोकळे; ऐकून तुमचंही काळीज हेलावून जाईल

गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव महाराष्ट्रातील सार्‍यानंच्याच परिचयाच झालं आहे. आपल्या नृत्यामुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणी कलाकार म्हणजेच गौतमी पाटील. लावणी क्वीन (queen) म्हणून प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. गौतमीने नृत्यातील तिच्या अदाकारी आणि हावभावामुळे सार्‍यांनाच वेड केलं आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. ती कायम दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत असते. गौतमी पाटील हीचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. पण काही दिवसांपासून ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या प्रकरणानंतर गौतमी पाटील संपुर्ण खचून गेली आहे. इतकच नाही तर गौतमीला अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. नेटकरांनी गौतमीच्या त्या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत. तसेच राजकीय क्षेत्रातून देखील गौतमीच्या व्हिडिओवरुन प्रतिक्रिया येत आहेत. लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी देखील गौतमीच्या हा व्हिडिओ शेअर करु नका अशी विनंती केली आहे.

गौतमीच्या या प्रकरणीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील दखल घेतली आहे. तसेच रूपाली चाकणकर यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. यादरम्यान आता खूप दिवसांनंतर गौतमी पाटीलने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी गौतमी पाटीलने संवाद साधला.

ती म्हणाली की, माझी बोलण्याची मनस्थिती नाहीय. पण मी तरीही आज तुमच्यासमोर आली. एवढेच बोलून गौतमीने माध्यमांशी बोलणं टाळलं. यावरून समजते की सध्या गौतमी पाटील मानसिक त्रासातून जात आहे. तसेच, लोक आपल्या सोबत आहेत या गोष्टीचा अभिमान वाटतोय. आपल्याला त्यांची साथ आहे. ही गोष्ट खूप छान वाटते, असेही गौतमी म्हणाली.

महिला आयोग माझ्यासोबत आहे त्याबद्दल बरं वाटलं, असेही गौतमीने म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात गौतमीचे लाखो चाहते आहेत. तर काही लोक गौतमीने नृत्यादरम्यान केलेल्या अश्लील हातवारे यावरून तिच्यावर टिका करत आहेत. अगामी ‘घुंगरू’ चित्रपटातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
भर पत्रकार परीषदेत ढसाढसा रडला ठाकरे गटाचा कट्टर आमदार; रडत रडत म्हणाला, मागे लागलेला हा फेरा…
ठाकरेंनीच चूक केली, ते मुख्यमंत्री झाले नसते, आदित्यला मंत्री केले नसते तर…; ठाकरे गटातील खासदाराची थेट टिका  
दूधधंद्यात कमावला बक्कळ पैसा; आज आहे १०० म्हशी आणि १०० एकर जमीनीचा मालक, वाचा यशोगाथा..