निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी शिवसेनेचे चिन्ह आणि नाव दोन्ही शिंदे गटाला दिले आहे. एकनाथ शिंदेंनी यांनी आपणच खरी शिवसेना असा दावा करत चिन्ह आणि नावाची मागणी केली होती. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला होता.
गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा वाद पाहायला मिळत आहे. या वादातील शिंदे गटाचा हा मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष ताब्यात आल्यानंतर आता ते मुंबईसह ते आजूबाजूच्या शाखा मिळण्याच्या तयारीला लागले आहे. ते मुंबई आणि आजूबाजूच्या शाखा ताब्यात घेऊ शकतात. त्यामुळे आता शाखा ताब्यात घेण्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात वाद होऊ शकतो.
मुंबई शिवसेना पक्ष तळागाळापर्यंत पोहचवण्यात शाखांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दापोलीतील एक शाखा घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला होता. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात चांगलाच वाद झाला होता. त्यामुळे आता पुन्हा त्यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
अशात शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदेंकडून खास रणनिती अवलंबली जाऊ शकते. मोठा संघर्ष टाळण्यासाठी एकनाथ शिंदे हळूहळू शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेऊ शकतात. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर १२ ते १३ जण सोडले तर फार लोक त्यांच्या गटात गेले नाही. त्यामुळे मुंबईमध्ये अजूनही ठाकरेंची ताकद असल्याचे दिसून येते.
मुंबईत शिवसेनेच्या २२७ शाखा आहे. तर मुंबई महानगरमधील सर्व शाखांची संख्या मिळून जवळपाच ५०० आहे. या शाखा शिवसेना पक्षाच्या नावावर नसून स्थानिक शाखाप्रमुखांच्या नावावर आहे. पण आता शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदेंना मिळाल्यामुळे शाखाप्रमुख शिंदे गटात येतील असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
तसेच शाखांसोबत कामगार संघटनांवरुनही वाद होण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या संस्थांमध्ये शिवसेनेच्या कामगार संघटना आहे. या कामगार संघटना पक्षासाठी खुप महत्वाच्या आहे. त्यामुळे या कामगार संघटना ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरेंचे राजकारणच संपणार? एकनाथ शिंदे आजवरचा सर्वात मोठा डाव खेळण्याच्या तयारीत
पुढच्या ६ महिन्यात देशाच्या राजकारणात उडणार खळबळ, मोदींना सोडावे लागणार पंतप्रधानपद
उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या निशाण्यावर; आता मनसेला दिला ‘हा’ मोठा धक्का