शुक्रवारी निवडणूक आयोगाने ठाकरेंना धक्का देणारा निर्णय दिला आहे. त्यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाने ७८ पानांचा निकाल दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हातातून शिवसेना गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागल्यामुळे आता अनेकजण ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊ शकतात. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊ शकतात. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना मैदानात उतरुन लढावं लागणार आहे.
ठाकरे सध्या मोठ्या अडचणीत सापडलेले आहे. कारण त्यांच्याकडे फक्त १५ आमदार आणि ४ खासदार आहे. तसेच शिवसेना आता शिंदेंकडे गेली आहे. त्यामुळे त्यांनी जर व्हिप काढला तर ठाकरे गटांच्या आमदारांना यामध्ये मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
शिंदेंनी व्हिप काढला तर त्यांना सरकारच्या बाजूने मतदान करावे लागेल, तसे त्यांनी केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. या आमदारांमध्ये ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरेंचादेखील समावेश आहे. व्हिपचं उल्लंघन केलं तर आमदार अपात्र ठरवला जाऊ शकतो.
व्हिप न मानणाऱ्या आमदाराच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांकडे असतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी जर व्हिप काढला आणि तो आदित्य ठाकरेंनी धुडाकावला तर त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळे ठाकरेंच्या १५ आमदारांसाठी तो व्हिप बंधनकारक असेल.
राहूल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केलं तर ते आमदारांवर कारवाई करु शकतात. त्यामुळे सरकारला मतदान न करण्याशिवाय आमदारांकडे दोनच पर्याय आहे. एक तर राजीनामा द्यावा नाहीतर व्हिपच्या दिवशी विधानसभेत न यावं. जर ते विधानसभेत येणार नसतील तर हजर न राहण्याचे त्यांना आधीच कारण द्यावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
फुट सभागृहात पडलीये, शिवसेना पक्षात नाही; सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी आली बाहेर
“वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा”; शिवसेना नेत्याने शेअर केलेले ‘ते’ फोटो चर्चेत; पहा फोटो
‘बागेश्वरला दिसेल तिथे ठोका’; तुकाराम महाराजांच्या अपमानानंतर भडकलेल्या ‘या’ बड्या नेत्याचे आदेश