कसबा चिंचवड पोटनिवडणूकीत आला मोठा ट्विस्ट! अजितदादांसोबत फडणवीसांचेही धाबे दणाणले

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा आणि चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणूकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने आणि भाजपने आपला उमेदवारही दिला आहे.

आता या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपसमोर आव्हानं उभी राहिली आहे. कारण निवडणूकीचा अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. राहूल कलाटे आपला उमेदवारी अर्ज मागे घेईल असे वाटत होते, पण त्यांनी अर्ज मागे घेतला नाही, तसेच कसब्यात आनंद दवेंंनीसुद्धा अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे भाजपचंही टेंशन वाढलं आहे.

चिंचवडच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचं टेंशन कायम आहे. कारण बंडखोर उमेदवार राहूल कलाटेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. तर कसब्यात दवेंनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यांनी भाजपची विनंती फेटाळली आहे. त्यामुळे आता दोन्ही निवडणूकींमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि राहूल कलाटे यांच्यात लढत होणार आहे. तर कसब्यात भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, आणि अपक्ष आनंद दवे यांच्यात लढत होणार आहे. चिंचवडमधून कलाटेंनी आणि कसब्यातून दवेंनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न केले गेले होते.

उद्धव ठाकरेंनी सुद्धा कलाटेंना फोन केला होता. मात्र कलाटेंनी आपला निर्णय बदलला नाही. राहूल कलाटे आधी शिवसेनेत होते. त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केलं होतं. त्यावेळी लक्ष्मण जगताप यांना १ लाख ५० हजार २३ मतं आणि कलाटेंना १ लाख १२ हजार २२५ मतं मिळाली होती.

त्या निवडणूकीत जगताप यांनी ३७ हजार ७९८ मतांनी विजय मिळवला होता. पण कलाटेंची १ लाख १२ हजार मते चर्चेचा विषय ठरली होती. आता तर कलाटेंनी एकतर्फी विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं टेंशन वाढलं आहे.

तसेच कसब्यात आनंद दवेंनी भाजपचं टेंशन वाढवलं आहे. दवेंनी आपला अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपने प्रयत्न केले होते. पण त्यांनीही अर्ज मागे घेतला नाही. कसब्यात ब्राम्हण उमेदवार दिला नाही. त्यामुळे दवेंनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे आता भाजपच्या मतांमध्ये फुट पडू शकते.

महत्वाच्या बातम्या-
भारताने ऑस्ट्रेलियाचा माज मोडला! एक डाव राखून दणदणीत विजय; WTC च्या फायनलमध्ये दाखल
पेट्रोल पंपावर टाकी फुल करण्यासाठी आले न्यायमूर्ती, घडलं भलतंच; रातोरात पेट्रोल पंप सील 
हिंडनबर्ग थांबायचं नाव घेईना, संतापलेल्या अदानी ग्रुपने घेतला मोठा निर्णय