..अन् क्षणात अदानींचे ७५०००००००००० कोटी रुपये गेले पाण्यात, श्रीमंतांच्या यादीत थेट १५ व्या स्थानी घसरण

अमेरिकेची रिसर्च फर्म हिंडनबर्गने प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना चांगलाच धक्का दिला आहे. त्यांनी अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे त्यांना हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी ग्रुपचे शेअर्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली कोसळल्या आहे.

हिंडनबर्गच्या अहवालामुळे दिवसेंदिवस गौतम अदानींची संपत्ती कमी होत आहे. काही दिवसांपूर्वी गौतम अदानी हे जगात सर्वात श्रीमंत असलेल्या व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. पण आता घसरुन थेट १५ व्या स्थानावर गेले आहे. त्यामुळे हिंडनबर्गचा अहवाल अदानींसाठी चांगलाच महागात पडल्याचे दिसत आहे.

हिंडनबर्ग ही एक रिसर्च कंपनी आहे. तिने २४ जानेवारी २०२३ ला अदानी समुहासंबंधी अहवाल प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये समुहावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये अदानी ग्रुपच्या कर्जाबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आले होते. याचा अदानी समुहाच्या गुंतवणूकदारांवर मोठा धक्का बसला आहे.

अदानी समुहाच्या शेअर्सच्या किंमती कोसळल्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीवरही त्याचा मोठा परीणाम झाला आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची घट होत आहे. मंगळवारी तर गौतमी अदानी जगातील १० सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीतून बाहेर पडले आहे.

अशात फोर्ब्सने धक्कादायक माहिती याबाबत दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासामध्ये गौतम अदानींच्या संपतीमध्ये ७५०००००००००० कोटींची घट झाली आहे. त्यामुळे आता त्यांची संपत्ती ७५.१ अरब डॉलर्स इतकी झाली आहे.

गौतम अदानी हे २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई करणारे अरबपती होते. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर सुद्धा पोहचले होते. पण २०२३ च्या सुरुवातीलाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना ऍमेझॉनच्या जेफ बेझॉस यांनी मागे टाकलं. त्यानंतर हिंडनबर्गमुळे तर आता ते थेट १५ व्या स्थानावर पोहचले आहे.

महत्वाच्या बातम्या-
भाजप-शिंदे गटाला मतदारांनी दाखवला हिसका! मविआने जिंकल्या ३ जागा तर भाजपचा दारूण पराभव, मिळाली फक्त १ जागा
फडणवीसांना दणका! नागपुरात मविआचा दणदणीत विजय, भाजपचा बालेकिल्ल्यातच सुपडा साफ
रील्समुळे रातोरात ऊसतोड दाम्पत्य बनलं स्टार; पण प्रसिद्धी मिळताच धक्कादायक व्हिडीओ आला समोर