शेवटच्या क्षणी बदलला प्लान अन् तिथेच झाला घात! ४ जीवलग मित्रांचा विमानप्रवास ठरला अखेरचा

India: नेपाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेपाळच्या पोखरामध्ये रविवारी विमान कोसळले आहे. त्या अपघातात तब्बल ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथून पोखराला जात असताना दुहेरी इंजिन असलेले एटीआर विमान कोसळले.

विमान दुर्घटनेतील आतापर्यंत ६८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ४ जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये पाच भारतीयांचा समावेश आहे. विमान अपघाताचा अहवाल ४५ दिवसांत अपेक्षित आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अपघातग्रस्त विमानात बसलेल्या एका भारतीय तरुणाने घटनेपूर्वी फेसबुकवर लाइव्ह केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे विमान अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच भारतीयांपैकी चार उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एक बिहारचा आहे. चौघेजण नेपाळला फिरण्यासाठी गेले होते. त्यातील सोनू जयस्वाल या तरुणाने लाईव्ह व्हिडिओ केला होता. अपघातानंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी तातडीने मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली.

नेपाळ सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय चौकशी आयोग स्थापन केला आहे. नेपाळ मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत विमान अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल एक दिवसाचा शोक पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १६ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, विमान अपघातानंतर नेपाळचे लष्कर बचाव कार्यात गुंतले आहे. या विमान अपघातात पाच भारतीयांसह ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून त्यांना कोणीही जिवंत सापडले नसल्याचे नेपाळच्या लष्करी टिमने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –