असे म्हणतात जिद्द असली की नशिबाला पण आपल्यासमोर झुकावं लागतं. आपली परिस्थिती कितीही खडतर असली तरी जिद्दीने मेहनत घेत अनेकांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्यातलाच एक म्हणजे सिकंदर शेख. सिकंदरने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती.
सिकंदरचे वडील हे हमाल होते, पण आपल्या घरच्या परिस्थितीवर मात करत सिकंदर कुस्तीच्या आखाड्यात चांगल्या चांगल्या पैलवानांना आसमान दाखवत आहे. त्याने आपल्या कामगिरीतुन सर्वांची मने जिंकली आहे.
सिकंदर हा मूळ सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा आहे. घरी कुस्तीचा वारसा असला तरी परिस्थिती हलाखीची. त्यामुळे पैलवान असलेले वडील रशीद शेख हे निमगावच्या मगरांच्या तालमीत सराव करायचे. तालमीची स्वच्छता करत असल्यामुळे त्यांना खुराक मिळायचा. असं सुरू असताना एकेदिवशी त्यांच्या वडिलांची प्रकृती खराब झाली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा घरी परतावे लागले.
घरी आल्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यामुळे घर सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. पण त्यांनी कुस्ती सोडली नाही. कुस्तीतुन मिळणाऱ्या बक्षिसांमधून ते घर चालवत होते. त्यानंतर त्यांना दोन मुले झाली. त्यामुळे त्यांनी कामाला सुरुवात केली. ते मार्केट यार्डमध्ये हमाली करू लागले.
आपल्याला खेळता आले नाही म्हणून काय झाले आपल्या मुलांना पैलवान बनवू असे म्हणत त्यांनी सिकंदरला आखाड्यात उतरवले. तो कुस्ती खेळण्यासोबतच लष्करात भरती होण्याची तयारी करू लागला होता. अखेर तो लष्करात भरती झाला. त्यानंतर सुद्धा त्याने कुस्तीचा नाद सोडला नाही आणि बक्षिसांनी आपली परिस्थितीच बदलून टाकली.
लष्करातही त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. त्याने कुस्तीत खूप बक्षिसे जिंकली आहे. त्याने आतापर्यंत एक महिंद्रा थार, एक ट्रॅक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टीव्हीएस बाईक, सहा हिरो होंडाच्या बाईक आणि तब्बल ४० चांदी्च्या गदा इतकी बक्षिसे जिंकली आहे.
महत्वाच्या बातम्या-
अभिनेते अशोक सराफ आहेत ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त; पत्नी निवेदितांनी सांगीतलेल्या माहितीने सिनेसृष्टी हादरली
सासरच्या त्रासाला कंटाळून मुंबईत आली; २ रुपये भांडवलावर उभारली २ हजार कोटींची कंपनी
‘BCCI पैसे घेऊन संघात निवड करते’ असा आरोप करणाऱ्या क्रिकेटपटूचा मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह