Share

‘या’ मुंबईकर खेळाडूने केला कहर; 81 चौकार, 18 षटकारांच्या मदतीने केल्या 508 धावा

महाराष्ट्राचा 13 वर्षीय फलंदाज यश चावडे याने इतिहास रचला आहे. यशने मुंबई इंडियन्स ज्युनियर स्कूल स्पर्धेत 508 धावांची नाबाद खेळी खेळली. नागपुरात शुक्रवारी झालेल्या या 40-40 षटकांच्या सामन्यात यशच्या संघ सरस्वती विद्यालयाने एकही विकेट न गमावता 714 धावा केल्या.

प्रत्युत्तरात प्रतिस्पर्धी सिद्धेश्वर विद्यालय संघ 20 षटकांत सर्वबाद 90 धावांवर आटोपला. अशाप्रकारे सरस्वती विद्यालयाने 705 धावांनी सामना जिंकला. यशने 178 चेंडूंचा सामना करताना 81 चौकार आणि 18 षटकार मारले. कोणत्याही आंतरशालेय मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात 500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा यश हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

या प्रकारात सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेच्या चिरथ सेलेपेरुमाच्या नावावर आहे. चिरथने 2022 मध्ये श्रीलंकेत 15 वर्षांखालील सामन्यात 553 धावांची खेळी केली होती. क्रिकेट सांख्यिकीतज्ज्ञ मोहनदास मेनन यांच्या मते, यशची खेळी ही कोणत्याही फॉरमॅटमध्ये आणि कोणत्याही वयोगटातील 500 धावांच्या वरची केवळ 10 वी इनिंग आहे.

यापैकी पाच वेळा भारतीय फलंदाजाने हा पराक्रम केला आहे. यशच्या आधी, प्रणव धनवडे (1009 धावा), प्रियांशू मोलिया (556 धावा), पृथ्वी शॉ (546 धावा) आणि दादी हावेवाला (515 धावा) हे भारतीय फलंदाज होते ज्यांनी अशा मोठ्या खेळी खेळल्या.

या चार फलंदाजांनी एका दिवसापेक्षा जास्त सामन्यात इतक्या धावा केल्या होत्या. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 500+ धावा करणारा यश हा पहिला भारतीय ठरला. यश सुरुवातीला स्केटिंगमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करत होता. वयाच्या 10 व्या वर्षी त्याने स्केटिंगमध्ये चांगले यश मिळवले होते.

राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही चांगले परिणाम आले. पण त्याच्या वडिलांना असे वाटले की या खेळाला भारतात चांगले भविष्य नाही. त्यानंतर त्याने यशला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. सरस्वती विद्यालयापूर्वीही अनेक नामवंत क्रिकेटपटूंची नावं समोर आली आहेत.

विदर्भ रणजी संघाचा विद्यमान कर्णधार फैज फजल हा देखील याच शाळेचा विद्यार्थी राहिला आहे. फैजने यापूर्वी 14 वर्षांखालील क्रिकेटमध्ये शालेय संघाकडून खेळताना 280 धावांची खेळी केली होती. विदर्भाचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक फलंदाज अक्षय वाडकरही याच शाळेच्या संघात खेळला होता.

महत्वाच्या बातम्या
विराटला नाही तर ‘या’ खेळाडूला रोहितने ठरवलं मालिकेचा हिरो; सगळ्यांसमोर म्हणाला, तो एक…
रितेशच्या वेडने अर्जुन कपूरच्या कुत्तेला अक्षरक्ष: झोपवले, बाॅलीवूडला दाखवली मराठीची ताकद
sikandar shaikh : वडील हमाली करताना मुलगा पैलवानी करून बनला ‘सिकंदर’, कुस्तीत जिंकल्या २४ बुलेट अन् थार
शिक्षण फक्त 9 वी, एकेकाळी 22 बँकांनी नाकारलं कर्ज, आता उभारला करोडोंचा उद्योग; वाचा पार्वतीबाईंची गोष्ट..
४ गुणांचा वाद, सिकंदरवर अन्याय झाला असं म्हंटलं जातंय, पण नेमकं काय घडलं? जाणून घ्या

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now