रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 30 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल झाला आणि याने सर्व रेकॉर्ड मोडायला सुरूवात केली. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे.
सिनेमॅटोग्राफीपासून कलाकारांच्या अभिनयापर्यंत सर्वाना आवडलेल्या मजिली या तेलगू चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे. रितेश देशमुखने वेड चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. गेल्या दोन आठवड्यांत त्याने अभिनेता आणि दिग्दर्शक बनण्याची जोखीम पत्करून चांगलीच कमाई केली आहे.
या चित्रपटाने बाकीच्या चित्रपटांना थिएटरमध्ये तगडी टक्कर दिली आहे. 15 व्या दिवशीची या चित्रपटाची घौडदोड कायम आहे. ‘वेड’ अनेक मोठ्या चित्रपटांना तगडी स्पर्धा देत जबरदस्त कमाई केली आहे. 200 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या ‘अवतार 2’ आणि ‘दृश्यम 2’समोर ‘वेड’ चित्रपट अजूनही भक्कमपणे उभा आहे.
यादरम्यान आता अर्जुन कपूरच्या 13 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या कुत्ते चित्रपटाला वेडने तगडी टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट केवळ 1.07 कोटींचा गल्ला जमवू शकला. तर ‘वेड’चे पहिल्या दिवशीचे कलेक्शन अडीच कोटी होते.
दुसरीकडे, चित्रपटाच्या 15 दिवसांच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच हा चित्रपट 50 कोटींचा आकडा गाठणार आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्सपर्ट अॅनालिस्ट तरण आदर्श म्हणाले की, मराठी चित्रपट वेडने तिसऱ्या शुक्रवारीही चांगली कमाई सुरूच ठेवली आहे.
चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडमध्ये 1.35 कोटींचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत चित्रपटाने एकूण 42.20 कोटींची कमाई केली आहे. 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात रितेश आणि जेनेलियाशिवाय सलमान खान, जिया शंकर, अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी आणि विनीत शर्मा यांनीही काम केले आहे.
वेड चित्रपटामुळे बाकीच्या चित्रपटांना झटका बसला आहे. कारण या चित्रपटाचे शो अजूनही हाऊसफुल चालले आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. रितेश देशमुखने दाखवून दिले आहे की, मराठी चित्रपटाची ताकद काय आहे.






