Team india | टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाने 2 धावांनी विजय मिळवला. वेगवान गोलंदाज शिवम मावीने पदार्पणातच चमकदार कामगिरी केली. त्याने 4 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग आाजारी असल्यामुळे उत्तर प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाला संधी मिळाली.
आता जर अर्शदीप दुसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त झाला तर तो कोणाच्या जागी खेळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. तर संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाला आहे.
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरबद्दल बोलायचे झाले तर इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन हे तिघेही अपयशी ठरले. दुसऱ्या सामन्यात ते चांगली फलंदाजी करतील अशी आशा आहे. सॅमसन दुखापतग्रस्त झाला आहे. तो खेळला नाही तर राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळू शकते.
हार्दिक पांड्याला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. तर दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी चांगली फलंदाजी केली. संघाला विजयी धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी दोघांनीही चांगली कामगिरी केली. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल फ्लॉप ठरले.
चहलने फक्त दोन षटके टाकली. त्याने या षटकांमध्ये 26 धावा दिल्या. दुसरीकडे, श्रीलंकेच्या फिरकीपटूंबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी भारतीय फलंदाजांवर सुरूवातीपासूनच नियंत्रण ठेवले होते. अशा परिस्थितीत चहलऐवजी कुलदीप यादवला दुसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. त्याचवेळी हर्षल पटेलने 2 विकेट घेतल्या, पण त्याने 4 षटकात 41 धावा दिल्या.
जर अर्शदीप सिंग दुसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त असेल तर त्याला हर्षल पटेलच्या जागी प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. टीम इंडियासाठी चांगली गोष्ट म्हणजे हार्दिक पंड्याने गोलंदाजी करत श्रीलंकेला अडचणीत आणले होते. उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी अतिशय उत्तम गोलंदाजी केली.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११- इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल/अर्शदीप सिंग, शिवम मावी, युझवेंद्र चहल/कुलदीप यादव, उमरान मलिक.
महत्वाच्या बातम्या
sharad pawar : ‘या’ कारणामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत; शरद पवारांनी भाजपवर फोडले खापर
वेड चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून जेनेलिया भावूक, म्हणाली, टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही..
amit shaha : अन् त्याक्षणी अमित शाहांनी ठरवलं की मविआ सरकार खाली खेचायचं; वाचा सत्तांतराची Inside Story
श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात भारताचा विजय, लंकेच्या तोंडातून हिरावला विजयाचा घास