Ameya ghole | शिवसेनेनंतर आता युवासेनेतही फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. आदित्य ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक अमेय घोले शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अमेय घोले हे आदित्य ठाकरेंवर नाराज आहेत आणि त्यांनी युवासेनेचा व्हॉट्स ऍप ग्रुपही लेफ्ट केल्याची चर्चा रंगली होती.
ते शिंदे गटात जातील असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता स्वत: अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या मनातील शिवसेना, युवासेना ही बाळासाहेबांचीच आणि आम्ही कायम शिवसैनिकच राहणार.
युवासेना आम्ही बाळाप्रमाणे सांभाळली, आदित्य ठाकरे आणि आम्ही बघितलेलं स्वप्न पुर्ण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. तसेच नाराजी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण यावेळी त्यांनी कोणाचंही नाव घेण्यास नकार दिला.
पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील मनातील शिवसेना आणि युवासेना ही बाळासाहेबांची. आम्ही कायम शिवसैनिक राहणार. युवासेना आम्ही बाळाप्रमाणे सांभाळली आहे. आदित्य ठाकरे आणि आम्ही बघितलेलं स्वप्न पुर्ण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण सध्या युवासेनेत मोनोरेल सुरू झाली आहे.
आमचा फिडबॅक आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचत नाही. मी माझं म्हणणं आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचवलं आहे. माझी नाराजी व्यक्त केली आहे. मला कोणाचंही नाव घेण्यात रस नाही असं अमेय घोले यावेळी म्हणाले. पुढे ते असंही म्हणाले की, हक्काची युवासेना मोठी व्हावी यासाठी मी काम केलं आहे. स्थानिक स्तरावरील नियुक्त्या मेरीटवर झालेल्या नाहीत.
याबाबत मी आदित्य ठाकरे यांना तक्रार केली होती. माझ्या वॉर्डमध्ये सर्वाधिक शपथपत्र देण्यात आली. पदही ऑन मेरीटच दिली जातात. पण कोअर कमिटीच्या सदस्यांना विचारलं जात नव्हतं. आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांनी मला भावाप्रमाणे, मित्राप्रमाणे सहकार्य केलंय. मी त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहतोय. मी युवासेनेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहे, असं अमेय घोले यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
भारत vs श्रीलंका दुसरा T20 सामना आज; वाचा कधी, कुठे आणि कसा Live पाहता येईल हा सामना
Abhimanyu ishwaran : मुलासाठी बापाने उभारलं क्रिकेटचं स्टेडियम, मुलाने तिथेच शतक झळकावत बापाचं स्वप्न साकार केलं
gautam gambhir : धोनी, सचिन किंवा मी नाही तर ‘हा’ मराठमोळा खेळाडू होता २०११ च्या वर्ल्डकपचा खरा हिरो; गंभीरने सांगीतले नाव
शाहरूखचा मुलगा आयर्नने पटलली बाॅलीवूडमधील सर्वात बोल्ड आयटम गर्ल; दोघांचे ‘ते’ फोटो झाले लीक