घरातील लहानमोठ्या सर्वांना आहो पण आईला मात्र एकेरी हाक का मारतो रितेश; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Entertainment: बहुचर्चित ‘वेड’ या चित्रपटामुळे अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया डिसूझा हे कपल चर्चेत आले आहे. बॉलिवूड मधील एक आदर्श जोडी म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. त्यांच्या वागण्या बोलण्यात कायम संस्कार दिसून येतात. हेच संस्कार त्यांनी त्यांच्या मुलांवर देखील केले आहेत.

वेड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश व जेनेलिया विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. दरम्यान एका मुलाखती मध्ये रितेशला त्याच्या सर्वांनाच आदरपूर्वक आहो-जाहो बोलण्यावरून विचारले असता, त्याने मोठा खुलासा केला आहे. यावेळी उत्तर देताना रितेशने सांगितले आहे की, मी फक्त माझ्या आईलाच एकेरी हाक मारतो.

याशिवाय रितेश त्याच्या मुलांपासून घरातील सर्वांनाच ‘तुम्ही’ असे आदरपूर्वक बोलतो. ही त्यांच्या घराची परंपरा असून त्याचे काका व आजोबा देखील त्याला अजूनही ‘तुम्ही’ असेच म्हणतात. इतकंच काय तर रितेश त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलियाला सुद्धा ‘तुम्ही’ म्हणतो. अशी माहिती यावेळी रितेशने दिली आहे.

दरम्यान मुलाखतीमध्ये आणखी बोलताना तो म्हणाला की, प्रत्येक घरातली बोलण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहीजण घरातील प्रत्येकाला एकेरी हाक मारून त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम दाखवतात. ही गोष्ट चांगली आहे.

आईला एकेरी हाक मारण्याबाबत खुलासा करताना रितेशने एक प्रसंग या मुलाखतीमध्ये सांगितला आहे. मध्यंतरी एका अमराठी व्यक्तीने रितेशला प्रश्न विचारला होता की, तुम्ही सर्वांना आदराने बोलता पण आईला मात्र एकेरी हाक मारता. यामागे काय कारण आहे ?

यावर उत्तर देताना रितेशने सांगितले होते, ” तुम्ही देवांचा उल्लेख करताना नेहमी गणेशजी, शंकरजी, रामजी असा उल्लेख करता. मात्र आम्ही गणपती, शंकर, राम असा उल्लेख करतो. माझ्यासाठी देवाची आणि आईची जागा एकच आहे, म्हणून मी आईला एकेरी हाक मारतो.”

महत्वाच्या बातम्या –