Share

ajit pawar : अजित पवारांनी काढली उद्धव ठाकरेंच्या मागणीतील हवा, राऊतांनाही सुनावले खडे बोल; म्हणाले…

ajit pawar uddhav thackeray

ncp ajit pawar on uddhav thackerays demand  | राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे शिंदे-भाजप सरकारवर टीका करताना दिसून येत असतात.  भाजप असो वा शिंदे गट ते दोन्ही पक्षातील नेत्यांना धारेवर धरताना दिसतात. अशात विरोधी पक्ष हा फक्त शिंदे गटातील नेत्यांनाच टार्गेट करतो, या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. या सरकारमध्ये ज्या कुणाचे प्रकरण समोर येईल त्याला तुम्ही वेगळा रंग देऊ नका. विरोधकांकडून फक्त शिंदे गटातील नेत्यांनाच टार्गेट केलं जातं, असं चित्र रंगवू नका, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच विरोधीपक्ष म्हणून काम करत असताना दुजाभाव करत नाही. एकाला एक आणि दुसऱ्याला वेगळी अशी वागणूक देणं आम्हाला पटत नाही. माझ्याकडे तीन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती आली आहे पण विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका मांडत असताना ठोस पुराव्यांची गरज असते. या संदर्भात पुरावे मिळतील तेव्हा लगेचच मी भूमिका मांडेल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊतांनावरही निशाणा साधला आहे. बॉम्बस्फोट होणाऱ्यांना विचारा तो केव्हा होईल. मी असं काही बोललो नव्हतो, असे म्हणज अजित पवारांनी राऊतांना टोला लगावला आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीवरही प्रतिक्रिया दिली आहे.

सीमाभाग केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून त्यातून वेगवेगळे वाद निर्माण होतील. आपली इच्छा असली तरी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असताना केंद्र सरकार त्याला मान्यता देणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी उद्धव ठाकरेंची ती मागणी व्यर्थ असल्याचे म्हटले आहे

जतमधील आणि अक्कलकोटमधील गावंही कर्नाटकात जाण्याची मागणी करत आहे. तर मग त्यांनाही त्यामध्ये टाकावं लागेल. त्यातून नवे प्रश्न निर्माण होतील. बेळगाव, कारवार, निपाणी आणि बिदर या गावांवर खऱ्या अर्थाने अन्यात होतोय. त्यांचं काय मत आहे हे आपण विचारलं पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच आपण जरी या गावांना केंद्रशासित करायचं म्हटलं तरी केंद्र सरकार याला पाठिंबा देणार आहे का? जर सर्वांचं एक मत असेल तर याला आमचा विरोध नाही. मराठी भाषकांवरील अन्याय रोखण्यासाठी जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
abdul sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, मुलीच्या नोकरीबद्दल धक्कादायक माहिती आली समोर
‘आदित्य ठाकरेंना सोडणार नाही, त्याने दिशा सालियनवर अत्याचार केले, त्याला तुरूंगात पाठवणारच’
अनवाणी पायांनी स्कूटीवर पळून जाताना दिसली ‘ही’ अभिनेत्री, चाहतेही लागले मागे; जाणून घ्या काय आहे पुर्ण प्रकरण…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now