police suspended after chandrakant patil ink throw | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर एका तरुणाने शाईफेक केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यात संतापाची लाट पसरलेली आहे. अशात त्याचा निषेध म्हणून एका तरुणाने चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केली आहे.
चंद्रकांत पाटलांवर कारवाई करणारा तरुण हा समता दलाचा कार्यकर्ता होता. पिंपरीतील कार्यक्रम पार पाडून चंद्रकांत पाटील हे सुरक्षेमध्ये बाहेर पडत होते. पण सुरक्षा भेदून तो तरुण आत गेला आणि त्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली आहे.
आता याप्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. शाईफेक प्रकरणात ११ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये ८ पोलिस कर्मचारी आहे, तर तीन वरिष्ठ अधिकारी आहे. त्यामुळे राज्य गृहमंत्रालयाने चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीला गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे.
शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील खुपच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोरही आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहे. माझ्यावर असे भ्याड हल्ले झाले तरी मी घाबरणार नाही. विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासमोर येऊन दाखवावं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील हे भाजपच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहे. ते आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. आता भाजपचे सरकार आल्यानंतर ते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री बनले आहे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला नेहमीच कडेलोट सुरक्षा असते. पण ही सुरक्षा भेदून तो तरुण आत गेला आणि त्याने चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केली आहे.
शाईफेक झाल्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण यात पोलिसांचा काहीच दोष नाही असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. माझ्यावर शाईफेक झाली त्यावेळी माझ्यासोबत असलेल्या पोलिसांचे निलंबन मी होऊ देणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विनंती करतो, असेही पाटलांनी म्हटले आहे. तरीही राज्य सरकारकडून काही तासांतच ११ पोलिसांना निलंबित करण्यात आलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
एका चौकात मुलींची छेड काढणाऱ्यांना पुढच्या चौकात जाईपर्यंत गोळ्या घातल्या जातील – योगींचे आदेश
‘आम्हाला पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद हवा आहे’; केजरीवाल मोदींशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत
इशान किशनचे द्विशतक पूर्ण होताच विराट कोहलीने मैदानावरच सुरु केला भांगडा, व्हिडीओ व्हायरल