Share

Cricket: घरात एकच बाप असावा, सात सात बाप असतील तर..; जडेजाची टिका रोहीत शर्माला झोंबणार

Cricket: इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताच्या पराभवानंतर कर्णधार रोहित आणि बाकीच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे. अर्शदीप वगळता सर्व भारतीय गोलंदाजांना संघातून वगळल्याची चर्चा आहे. याशिवाय टि२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० विकेटने पराभव झाल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे विरोधी संघाने १६ षटकांत सहज गाठले.

सामना संपल्यानंतर माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि अजय जडेजा यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले. सेहवाग म्हणाला की, रोहितवरचे दडपण आज स्पष्टपणे दिसत आहे, तर जडेजा म्हणाला की, संघ घडवण्यासाठी कर्णधाराला वर्षभर संघासोबत राहावे लागते.

अजय जडेजा पुढे बोलताना म्हणाला, ‘मी एक गोष्ट सांगेन की , मी हे पराभवामुळे बोलत नाही, हे मी यापूर्वीही सांगितले आहे. जेव्हा तुम्हाला एकखादी टिम बनवायची आहे. तेव्हा संपूर्ण वर्षभर तुम्ही त्या टिमसोबत राहणे गरजेचे असते. कोचला संघ बनवावा लागतो, तो न्यूझीलंडला जात नाही. मग संघ कसा तयार होणार? घरात एक वडिल असावा, घरात ७ वडील असले तरी अडचण येते.

त्याचवेळी वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘आज त्याला रोहित शर्मा दिसला नाही, जो रोहित शर्मा पूर्वी कर्णधार म्हणून पाहायचा. आज पहिल्यांदाच त्यालाही दडपण जाणवलं. त्याने केलेले बदल म्हणजे अक्षर पटेलकडून पाॅवरप्लेमध्ये गोलंदाजी करुन घेतली. मोहम्मद शमीला गोलंदाजी दिली गेली नाही, अर्शदीपला दुसरे षटक मिळाले नाही, भुवीने पहिले षटक कीपरला टाकले. त्यामुळे रोहित शर्मानेही आज कर्णधार म्हणून खूप काही केले नाही.

तसेच, आपण म्हणतो की रोहित जगातील किंवा भारतातील सर्वोत्तम कर्णधार आहे, परंतु आज त्याने गोष्टी योग्य केल्या नाहीत. कर्णधार म्हणून जेव्हा तुमच्यावर दबाव येतो तेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता, असेही वीरेंद्र सेहवाग म्हाणाला.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या या पराभवामुळे भारताचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. टि २० विश्वचषक २०१४ नंतर भारताने या स्पर्धेचा अंतिम सामना खेळलेला नाही. दुसरीकडे, या विजयासह इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १३ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानसोबत त्यांची विजेतेपदाची लढत होणार आहे.

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now