Share

Virat Kohli: सामना गमावल्यानंतर बांगलादेशने विराटवर केला गंभीर आरोप, ७ व्या षटकात घडलं असं काही की..

Virat Kohli: भारताविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात 5 धावांनी पराभूत झाल्यानंतर बांगलादेशने भारतावर फेक फील्डिंगचा आरोप केला आहे. बांगलादेशचा खेळाडू नुरुल हसनने असा दावा केला की, विराट कोहलीने सामन्यादरम्यान फेक फील्डिंग केले होते आणि अंपायर त्याला मैदानावर पाहू शकले नाही, जर पंचांनी त्याला पाहिले असते तर बांगलादेशला पेनल्टीच्या 5 धावा मिळू शकतात जे संघासाठी खूप महत्वाच्या होत्या. Virat Kohli, India, Bangladesh, Fake Fielding,

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, नुरुल हसनने आरोप केलेल्या फेक फील्डिंगची घटना 7 व्या षटकात घडली, जेव्हा बांगलादेश संघ अॅडलेडमध्ये भारताच्या 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. यावेळी लिटन दास स्फोटक फलंदाजी करत होता. अर्शदीप सिंगने जेव्हा चेंडू फेकला तेव्हा विराट कोहली पॉईंटवर उभा होता, चेंडू त्याच्याजवळून जात होता आणि यादरम्यान कोहलीने फेक फील्डिंग करत चेंडू फेकत असल्याचे दाखवले. मात्र, त्यावेळी पंचांच्या ते लक्षात आले नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या दोन्ही फलंदाजांना ही घटना पाहता आली नाही. लिटन दास आणि नजमुल या दोन्ही फलंदाजांनी मैदानावरील पंच मरे इरास्मस आणि ख्रिस ब्राऊन यांच्याकडे तक्रार केली नाही. त्यामुळे टीम इंडियावर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, सामना संपल्यानंतर नुरुलने त्याचा उल्लेख मीडियासमोर केला.

नूरुलने सांगितले की, मैदान ओले असल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे, जेव्हा या गोष्टींचा विचार केला जातो तेव्हा थ्रो फेकचीही चर्चा होते. यामुळे 5 धावांची पेनल्टी लागू शकली असती आणि सामना आमच्या बाजूने जाऊ शकला असता, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही.

क्रिकेटच्या नियम 41.5 नुसार, जर एखाद्या खेळाडूने जाणूनबुजून फलंदाजाच्या खेळात अडथळा आणला, लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आणि अंपायरला असे करताना आढळले, तर ते तो चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करू शकतात आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा देऊ शकतो. तथापि, विराट कोहलीने जे केले ते निःसंशयपणे फेक फील्डिंग होते परंतु त्याचा फलंदाजांवर अजिबात परिणाम झाला नाही, त्यामुळे याकडे फलंदाजांना व्यत्यय म्हणून पाहिले जाऊ शकत नाही.

महत्वाच्या बातम्या-
KL Rahul : धडाकेबाज अर्धशतक करूनही नाराज आहे राहूल; सामन्यानंतर दिली हैराण करणारी प्रतिक्रीया, म्हणाला…
Virat Kohli: विराटला आक्रमक फलंदाजी करताना पाहून राहुल द्रविडने आणि रोहितने त्याला पाठवला होता ‘हा’ संदेश
Virat Kohli : हे तर भारताचे दोन वाघ आहे…; विराट-सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहून चाहते झाले भलतेच खुश

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now