राज्यात थंडीची चाहूल लागू लागली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने मात्र शेतकऱ्यांना चांगलेच हैराण केले आहे. पावसाने शेतातील पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांसामोर समस्या उभ्या राहिल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास निघून गेला आहे.
यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका देखील मोठ्या प्रमाणात बसला. याची दखल आता राजकीय नेत्यांनी देखील घेतली आहे. राजकीय नेते मंडळी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या दु: खात सहभागी होत आहे. तर दुसरीकडे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील केले जातं आहेत.
शेतकरी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे विरोधक देखील याच मुद्यावरून राज्य सरकारवर धारेवर धरत आहेत. अशातच एक वेगळी बातमी समोर येत आहे. विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
विमा काढताना कंपनीने शेतकरी व केंद्र तसेच राज्य सरकारकडून ८० रुपये १६ पैसे गुंठ्याने रक्कम जमा केली. मात्र आता खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना परतवा मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. याच मुद्याचा आधार घेत शेतकरी थेट कोर्टात जाणार असल्याच बोलल जातं आहे.
दरम्यान, प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत राहाता तालुक्यातील केलवड येथील बाबूराव सावळेराम गमे या शेतकऱ्याला एका गुंठ्यामागे ५.३८ रुपयाने रक्कम खात्यात जमा झाली. एका गुंठ्यामागे शेतकऱ्यांकडून ११ रु. ४५ पैसे व सरकारकडून ६८ रु. ७१ पैसे भरलेले असतात.
मात्र असं असलं तरी देखील, केलवडचे शेतकरी बाबूराव सावळेराम गमे यांनी २ हेक्टर ६१ आरवर विमा उतरविला होता. मात्र धक्काडायक बाब म्हणजे, १०० टक्के नुकसान होऊनही त्यांना फक्त १,४०६ रु. खात्यात वर्ग केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
आता शेतकरी थेट न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असताना केवळ नगण्य रक्कम का दिली, असा सवाल आता शेतकऱ्यांना पडला आहे. याच मुद्यावरून सध्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या-
दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिणी, रात्री नवऱ्याला समोसा खाऊ घातला अन् त्यानंतर…
Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या
bachchu Kadu : दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडूंनी रवी राणांना दिला इशारा; म्हणाले, यापुढे वाट्याला गेला तर…