india : “त्याचा आनंद मला बघवत नाही”, इंडिया जिंकल्याने पाकिस्तानी बायकोनं भारतीय नवऱ्याला दिली शिक्षा

india : रविवारचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचा होता. टी – 20 विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानला आसमान दाखविले. भारतीय टीमवर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे.

अशातच एक वेगळी बातमी समोर येतं आहे.  रविवारी टी २० वर्ल्डकपमधला भारताचा पहिला सामना पार पडला. हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होता. या सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. हा सामना खुपच थरारक झाला होता.

विराटच्या जबरदस्त खेळीमुळे भारतीय संघाला हा सामना जिंकता आला. तर आता पाकिस्तानमध्ये निराशाचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढंच नाही तर, दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची खुन्नस पाहायला मिळाली. विशेष बाब म्हणजे, अशीच कट्टर खुन्नस पाकिस्तानी बायको आणि भारतीय नवरा असलेल्या जोडप्यातही पाहायला मिळाली आहे.

भारतीय संघाच्या विजयानंतर पाकिस्तानी बायकोनं भारतीय नवऱ्याला चांगलीच शिक्षा दिली आहे. पाकिस्तानी बायकोनं भारतीय नवऱ्याला दोन दिवसांसाठी ब्लॉक केलं आहे. मिळालेल्या महितीनुसार, कुरअत-उल-ऐन असं पाकिस्तानी पत्नीचं नाव आहे. अली इक्बाल असं भारतीय पतीचं नाव आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता. सध्या दोघंही ऑस्ट्रेलियात वास्तव्याला आहेत. कुरअत-उल-ऐन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, “भारत-पाकिस्तानच्या सामन्यानंतर इक्बाल यांना झालेला आनंद मला अजिबात सहन होत नाही.”

महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल