bjp : कालचा दिवस सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. काल राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले. सर्व राज्याचं लक्ष्य या निकालाकडे लागलं होतं. राज्यात नुकतच सत्तांतर झालं. शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांकडे सर्वांचे अधिक लक्ष्य होतं.
राज्यात झालेल्या सत्तांतराचा गाव पातळीवर काय परिणाम होतोय? हे पाहणे महत्त्वाचे ठरतं आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कसून तयारी केली. विशेष बाब म्हणजे, या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा समोर आला आहे. भाजपा आणि शिंदे गट अशा एकूण ३५२ ठिकाणी विजय मिळाला, तर मविआने ४५१ ठिकाणी विजय मिळवला.
काल राज्यातील १८ जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून, भाजपचे २२१, शिंदे गटाचे ११२, ठाकरे गटाचे १०६, काँग्रेसचे १३१ आणि राष्ट्रवादीचे ९१ उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. राज्यात भाजपचीच हवा असल्याचं पाहायला मिळालं.
काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बड्या – बड्या नेत्यांना धक्का बसला आहे. तर दुसरीकडे काही नेत्यांनी मात्र आपला बालेकिल्ला राखून ठेवला आहे. शिंदे गटातील नेत्यांना जबर धक्का बसला असल्याचं चित्र या निवडणुकीत पाहायला मिळालं.
रायगड जिल्ह्यात शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले आणि खालापूर आमदार महेंद्र थोरवेंनार यांना धक्का बसला आहे. मात्र असं असलं तरी देखील, भारत गोगावलेंच्या पॅनलचा त्यांच्याच गावात दारुण पराभव झाला आहे. मात्र असं असलं तरी देखील भारत गोगावलेंच्या पॅनलचे 10 उमेदवार जिंकले.
मात्र, असं असलं तरी देखील सरपंचपदाच्या निवडणुकीत गोगावलेंचा उमेदवार पराभूत झाला. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना जबर धक्का बसला आहे. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातल्या मोरगिरी ग्रामपंचायतीत मंत्री शंभुराज देसाई यांच्या पॅनलनं सर्व जागा जिंकत राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला चारी मुंड्या चीत केलं आहे.
devendra fadanvis : फडणवीसांच्या खेळीमुळे आशिष शेलारांचा झाला गेम, भाजपने माघार घेतल्यामुळे पडले तोंडघशी
Sanjay Raut : माघार घेतली नसती तरी आम्ही जिंकलोच असतो, राऊतांनी थेट तुरूंगातून सांगीतला मताधिक्याचा आकडा
Shakti Kapoor : अभिनेत्रीचे शक्ती कपूरवर गंभीर आरोप, म्हणाली, बोल्ड सीन करताना तो एवढा उत्तेजीत झालता कि….