girish mahajan : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलेले आपण पाहिले आहे. असं असतानाच आता आणखी एक महाजन यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सध्या या ऑडिओ क्लिपची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य पदभरतीबाबब माहिती विचारणाऱ्या उमेदवाराला गिरीश महाजन यांनी उत्तर दिल्याची कथित ऑडियो क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे आता महाजन यांच्या अडचणींमद्धे वाढ होणार असल्याचं बोललं जातं आहे.
या व्हायरल क्लिपबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा येथील एका विद्यार्थ्याने जिल्हा परिषदेच्या जागेसाठी लवकर परीक्षा घेण्याची मागणी महाजन यांच्याकडे फोनवरून केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्हा परिषद भरतीबाबत महाजन हे विद्यार्थ्यासोबत अर्वाच्य भाषेत बोलताना ऐकू येत आहे.
यामुळे महाजन हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडणार असल्याचं बोललं जातं आहे. व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये एक विद्यार्थी झेडपीची फाईल तुमच्याकडे आली असून ती पाठवा ना साहेब, मुलं खूप डिप्रेशनमध्ये आहेत, असं सांगत आहेत. या क्लिपमधील व्यक्ती मंत्री महाजन असल्याच बोललं जात आहे.
तसेच या क्लिपमध्ये ते म्हणतायत, ‘तुम्हाला काही कामं नाहीत का रे, दिवसरातून ५०० फोन लावता, मी काही करत नाही ती रद्द झाली, असं म्हणतायत. त्यावर समोरचा विद्यार्थी ‘अहो साहेब मुलं डिप्रेशनमध्ये आहेत, असं म्हणतोय त्यावर समोरुन ‘रद्द केली, ती ठेव फोन, असं बोलणारी व्यक्ती ही मंत्री महाजन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे राज्याचं राजकारण चांगलचं ढवळून निघालं आहे. या क्लिपमधील व्यक्ति मंत्री महाजनचं असल्याचं जरी बोललं जातं असलं तरी देखील अद्याप पूर्ण माहिती याबद्दल समोर आलेली नाहीये. याचबरोबर या प्रकरणावर अद्याप महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली नाहीये.