Share

devendra fadnavis : ‘दसरा मेळाव्यात कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं, अन्यथा…,’ फडणवीस स्पष्टच बोलले

devendra fadnavis : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळी आपलं मत व्यक्त करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दसरा मेळाव्यात कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं, असा सल्ला दिला आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटणार असल्याचं बोललं जातं आहे.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार आहे. राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकांपासून काहीच अडचण नाही. मात्र त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करू नये म्हणून आम्ही काळजी घेणार आहेत, असं फडणवीस स्पष्टच बोलले.

सोमवारी फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शन घेतले. देवी दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हंटलं आहे की, शिंदे – फडणवीस सरकारच्या माध्यमातून लोकहिताचे काम करण्यासाठी देवीकडे शक्ती मागितली, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, दसरा मेळाव्यात कायद्याच्या पलीकडं जाणून कोणी बोललं तर कायदा आपलं काम करेन. एकमेकांवर टीका ही कायद्याच्या चौकटीत राहून करावी, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांनी एक प्रश्न विचारला की, तुम्ही कोणता मेळावा अटेन्ट करणार?

यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. फडणवीस यांच्या प्रतिक्रियेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे एक वेगळीच बातमी समोर आली आहे.

शिंदे गटाने मेळाव्यासाठी मनसे – भाजपच्या कोणत्याच नेत्यांना आमंत्रण दिलं नसल्याचं बोललं जातं आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी भाजपच्या आणि मनसेच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून मिळाली आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now