Share

Bhabhi ji ghar par hai : भाभीजी घर पर है मधील अभिनेत्यावर कोसळला दुखाचा डोंगर, अवघ्या १९ वर्षांच्या पोटच्या पोराचे निधन

काही महिन्यांपूर्वी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध शो ‘भाभी जी घर पर हैं’ मधील मलखान म्हणजेच अभिनेते दीपेश भान यांचे निधन झाले. पण आता त्याच शोमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याच शोमधील एका अभिनेत्याच्या मुलाचे निधन झाले आहे.

तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जितू गुप्ता आहे. जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितू गुप्ता यांच्या मुलाचे नाव आयुष होते आणि तो केवळ 19 वर्षांचा होता. आपल्या तरुण मुलाच्या निधनामुळे अभिनेत्याला खूप मोठा धक्का बसला आहे.

अलीकडेच कॉमेडियन सुनील पाल यांनी आयुषच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाला श्रद्धांजली वाहिली. सुनील पाल यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट पुन्हा शेअर करून आयुषच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली आहे.

ते खूप भावनिक झाले होते. पोस्टमध्ये त्यांनी लिहीलं की,  ‘RIP, भाबी जी घर पर है मधील अभिनेता आणि माझा भाऊ जीतू याचा मुलगा आयुष (19 वर्ष) आता राहिला नाही.’ सुनील पाल यांनी काही रडण्याचे इमोजीही वापरले आहेत. आपल्या मित्राच्या मुलाच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसल्याचे या गोष्टीवरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, जीतू यांचा मुलगा आयुष गुप्ता गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होता. खुद्द जीतू यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून चाहत्यांना ही माहिती दिली होती. रुग्णालयात जीवन-मरणाशी लढा देत असलेल्या आपल्या मुलाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.

हे पाहून त्यांचे चाहते खूप दुःखी झाले आणि त्यांनी मुलगा लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. जीतू यांनी कॅप्शनमध्ये सांगितले होते की, ते कोणत्या टप्प्यातून जात आहेत. त्यांनी लिहिले, मुलाच्या प्रकृतीबद्दल पोस्ट वाचल्यानंतर, तुम्हा सर्वांचे त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन येत आहेत.

मित्रांनो हात जोडून विनंती आहे की, फक्त तुमचे आशीर्वाद द्या आणि देवाकडे प्रार्थना करा कारण यावेळी त्याची प्रकृती खूप गंभीर आहे, मी अजिबात बोलण्याच्या स्थितीत नाही आणि इतक्या लोकांना फोन करणे शक्य नाही. 27 सप्टेंबरलाही जितू यांनी सांगितले होते की त्यांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्याला प्रार्थनांची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या
shivsena : ..तर ठाकरेंना मुंबई महापालिका निवडणूकीत धनुष्यबाण नाहीच पण शिवसेनेचं नावही वापरता येणार नाही; माजी निवडणूक आयुक्त
Bacchu Kadu : “…तर आम्ही खपवून घेणार नाही” बच्चू कडूंच्या ‘त्या’ कृत्यानंतर भाजप नेत्याचा इशारा
Congress : काँग्रेसला मोठा धक्का; आपली ४५ वर्षे पक्षासाठी वाहणाऱ्या  ‘या’ बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश
Asafoetida: जगातील ४०% हिंग भारतात विकले जाते तरीही येथे हिंगाची शेती का केली जात नाही? वाचा इतिहास

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now