amit shah : अमित शाह यांच्या बैठकीत नाराजीनाट्य..! भाजपच्या फायरब्रँड नेत्यालाच दाखवला बाहेरचा रस्ता; वाचा सविस्तर

amit shah : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. सध्या भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह वेगवेगळ्या राज्यात दौरे करत आहेत. त्याचबरोबर बैठका घेत असून आगामी निवडणुकांबद्दल रणनीति आखत आहेत. अशातच भाजपच्या गोटातून एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

अमित शाह यांनी आयोजित केलेल्या बैठकीला बिहार भाजपचे फायरब्रँड नेते गिरिराज सिंहदेखील उपस्थित होते. मात्र त्यांची कार सुरक्षेच्या कारणामुळे बैठकस्थळापासून लांबच थांबवण्यात आली होती. हाच राग मनात धरून गिरिराज सिंह हे निघून गेले. सध्या गिरिराज सिंह यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वाचा नेमकं घडलं काय?
अमित शाह सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. काल म्हणजेच शुक्रवारी अमित शाह किशनगंज येथील माता गुजरी विद्यापीठात भाजप (BJP) कोअर कमिटीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. यामुळे बिहारमधील देखील भाजप नेते देखील या बैठकीसाठी दाखल झाले.

नंतर त्याचं झालं असं की, कार सुरक्षेच्या कारणामुळे बैठकस्थळापासून लांब गिरिराज सिंह यांना आपली कार लावावी लागली. आपली कार बाहेरच थांबण्यात आल्याचा राग डोक्यात ठेऊन गिरिराज सिंह हे तातडीने पुन्हा सर्किट हाऊसकडे गेले. त्यानंतर तयांची समजून काढण्यात आली.

अन् ते पुन्हा पुन्हा बैठकीला परत आले. दरम्यान, काल अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. मात्र भाजप नेत्यांच्या कार माता गुजरी विद्यापीठाबाहेरच थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्व नेते आपल्या वाहनातून उतरून पायीच जात कार्यक्रमस्थळी पोहचले होते.

यावरूनच गिरिराज सिंह हे प्रचंड भडकले. सध्या या प्रकरणाची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा आहे. काल बिहारमध्ये झालेल्या सभेत भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान बनण्याच्या हव्यासापोटी नितीश कुमारांनी पाठीत खंजीर खुपसला, असे शहा म्हणाले.