Share

Politics: आता लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला बसणार मोठा धक्का, सर्वेतून झाला मोठा खुलासा

panja ghadyal kamal

राजकारण(Politics): महाराष्ट्राच्या राजकारणात मागील २- ३ महिन्यापासून मोठ्या प्रणाणात उलथापालथ झाली. शिवसेनेसोबत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदाराचा वेगळा गट निर्माण करून भाजपासोबत सरकार स्थापन केले. या सर्व घडामोडीत महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. महाराष्ट्रातील सर्वच पक्ष जनतेचा पाठिंबा आपल्याच पक्षाला आहे, असा दावा करत आहेत.

पण महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला आहे की, सध्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला यश मिळेल. आता जनतेला याचे उत्तर इंडिया टुडे आणि सी व्होटर्ससच्या सर्व्हेमध्ये मिळाले आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने ऑगस्ट महिन्यात एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

यात अनेक धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. महाराष्ट्रात आज जर लोकसभा निवडणूक आता झाली तर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा सर्व्हे पूर्ण देशभरात करण्यात आला होता. या सर्वेनुसार जर आता निवडणूका झाल्या तर भारतीय जनता पार्टीच देशातील सर्वात मोठी पार्टी असेल.

सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुका आता झाल्या तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार एनडीए ला २८६ जागा मिळतील तर काँग्रेस आणि युपीएला मिळून १४६ जागा मिळतील, असे या सर्वेमध्ये सांगण्यात आले आहे.

देशातच नाहीतर महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर महाराष्ट्रात एनडीएला ४८ पैकी अवघ्या १८ जागा मिळतील. यूपीए ला मात्र, ३० जागा मिळतील, असा अंदाज सर्व्हेमध्ये काढण्यात आला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली. त्यानंतर शिवसेना कुणाची?

हा वाद आता सुप्रीम कोर्टात चालू आहे. यावर सुप्रीम कोर्ट काय निकाल देते हे पण महत्वाचे आहे. या निकालावरून सुद्धा महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निकाल देते याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व राहणार, मुंबईतील जनता उद्धव ठाकरेंनाच मतदान करणार असाही अंदाज या सर्व्हेमध्ये काढण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या
Palghar: सायरस मिस्त्रींच्या अपघातावेळी नेमकं काय घडलं? मर्सिडीज कंपनीच्या रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा
Thane: सासू म्हणाली, ‘टीव्हीचा आवाज कमी कर’, रागाच्या भरात सुनेनं केलं असं काही की पोलिसही हादरले
AFG vs IND : शेवटच्या सामन्यात विराट-भुवीने रचला इतिहास, भारताचा अफगाणिस्तानवर १०१ धावांनी दणदणीत विजय
Aditya Thackeray : पेंग्विनसेना म्हणत असतील तर आम्हाला अभिमान आहे कारण.., आदित्य ठाकरेंचे सणसणीत प्रत्यु्त्तर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now