आमदार आहात? लाज वाटली पाहीजे; सामान्य शिक्षकाने भाजप आमदाराला झापले, रेकाॅर्डींग व्हायरल

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक हे आमने – सामने आलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मुद्यावरून विरोधक हे सत्ताधाऱ्यांची कोंडी करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आता एका भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल होतं आहे.

भाजप आमदार प्रशांत बंब यांनी अधिवेशनात शिक्षकांच्यावर एक मुद्दा मांडला. आणि याच मुद्द्यावरून एका शिक्षकांने  आमदार प्रशांत बंब यांना चांगलेच धारेवर धरलेले या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळत आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये आमदार बंब एका सरकारी शाळेतील शिक्षकाशी बोलताना दिसत आहेत.

वाचा नेमकं प्रकरण काय?

भाजप आमदार प्रशांत बंब यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनादरम्यान, भाजप आमदार प्रशांत बंब यांनी अधिवेशनात शिक्षकांच्यावर एक मुद्दा मांडला. आणि यामुद्द्यावरून एका शिक्षकाने थेट आमदार प्रशांत बंब यांना धारेवर धरले.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये हा शिक्षक आमदार बंब यांना सरकारी शाळेत कशी दुरावस्था आहे, कोणकोणत्या समस्या आहेत, हे सांगत आहे. त्यावर आमदार बंब त्यांना आरेरावीची भाषा वापरताना दिसत आहेत. “मी काय बोलवं हे तुम्ही मला सांगू नका”, असं ते या शिक्षकाला सांगत आहेत.

दरम्यान, व्हायरल क्लिपमध्ये ‘तुम्ही कधी कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा पाहिल्या आहेत का? तिथं शौचालयं नाहीत सर. शाळेच्या छताचे पत्रे उडालेले आहेत. तुमच्या भागातल्या शाळेकडे तुमचं लक्ष आहे का? तुम्ही सरकारी शाळांबाबत एवढं बोलता. पण तुमच्या भागातील शाळांमध्ये शौचालयं नाहीत. मुलं उघड्यावर शौचाला बसतात, असं शिक्षकाने म्हंटलं आहे.

त्यावर बंब यांनी म्हंटलं आहे की, मग तुम्हा शिक्षकांना काही लाज वाटत नाही का? असं प्रतीसवाल बंब यांनी त्या शिक्षकाला केला. बंब म्हणाले की, तुम्ही यासाठी जबाबदार आहात असे म्हंटल्यावर शिक्षक म्हणाला तुम्ही आमदार आहात तुम्हालाच लाज वाटायला हवी, सरकार आम्हाला काम करू देत नाही असे शिक्षकाने उत्तर दिले.

महत्त्वाच्या बातम्या