Share

औरंगाबादेत शिवसेनेला जबर धक्का! उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानेही धरली शिंदे गटाची वाट

udhav thackeray

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच शिवसेना अजूनही जबर धक्के बसताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याने अख्ख ठाकरे सरकार कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हाव लागलं आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला.

आमदारांपाठोपाठ खासदारांनी देखील शिंदे गटाची वाट धरली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद आता वाढलेली पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार याआधीच एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.

मात्र असं असलं तरी देखील कालपर्यंत शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्रकुमार त्रिवेदी हे उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ होते. मात्र त्यांनी देखील शिंदे गटाची वाट धरली आहे. यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना जबर धक्का बसला आहे. याचबरोबर औरंगाबादमध्ये देखील आता शिवसेनेला आता खिंडार पडलं असल्याच बोललं जातं आहे.

शिवसेना धक्के बसत असतानाच शिवसेना नेत्यांकडून अनेक विधान करण्यात येत होती. आमदार गेले असले तरी देखील, शिवसैनिक आणि पदाधिकारी शिवसेनेसोबतच आहे, अशी वक्तव्ये शिवसेना नेत्यांकडून केली जात होती. मात्र असं असतानाच आता पुन्हा एकदा शिवसेनेला औरंगाबाद जिल्ह्यात धक्का बसला आहे.

दरम्यान, जिल्हा अध्यक्ष नरेंद्र कुमार त्रिवेदी यांनी सुद्धा आता शिंदे गटाची वाट धरली आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. विशेष बाब म्हणजे, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्रिवेदी यांची चांगली पकड आहे.

यामुळे येणाऱ्या काळात त्रिवेदी औरंगाबाद जिल्ह्यात कसा संपर्क वाढविणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नागपुरातील सहसंपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे आता शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काशीकर यांनी शिवसेना सोडल्यामुळे पक्षाला नागपुरात मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या
Bollywood: सलमान खानची अभिनेत्री ईडीच्या जाळ्यात; तब्बल २०० कोटींच्या घोटाळ्यात ईडीने केले आरोपी
Bollywood: फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांवर तब्बूची विचित्र प्रतिक्रिया, म्हणाली, कलाकारांनी टेंशन घेऊ नका कारण..
ठाकरेंजवळचा आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, उदय सामंतांच ‘ते’ वक्तव्य खरं ठरणार
Raigad : श्रीवर्धनमध्ये बोटीत आढळल्या एके-४७, दहिहांडीच्या आधीच महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now