Share

Narendra Modi: जगातील सर्वात सुरक्षित कारने मोदींची लाल किल्ल्यावर ग्रॅंन्ड एन्ट्री, जग पाहतच राहिले

modi car

नरेंद्र मोदी (Narendra Modi): भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झालीत. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” या मोहिमेला साथ देत प्रत्येक घरावर तिरंगा दिसत आहे. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावर पोहोचले त्यावेळी दोन गोष्टींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल रंगाची पगडी होती. ती पगडी गुजरातच्या जामनगरच्या शाही कुटुंबाने त्यांना भेट दिली होती. Range Rover Sentinel मधून मोदी प्रवास करतात. ही कार जगातील सर्वात सुरक्षित कार पैकी एक आहे. जेव्हा ते लाल किल्ल्याकडे रवाना झाले तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्या कारकडे होते.

Range Rover Sentinel ही जगातील सर्वात सुरक्षित कार आहे. कोणताही हल्ला सहज झेलू शकते. ही एक आर्मर्ड व्हीकल आहे. बॉम्ब आणि गोळ्यासोबतच या कारवर IED ब्लास्टचा काहीच परिणाम होत नाही. Range Rover Sentinel चे सर्वात विशेष म्हणजे ती पंक्चर झाल्यानंतरही चालते. ही कार पाणी, चिखल, दगडात सहज चालू शकते. पीएम मोदी यांची Range Rover Sentinel चे टायर डॅमेज झाल्यानंतरही १०० किमीपर्यंत सहज कार जावू शकते.

पीएम मोदी यांच्या कारचे सर्वात मोठे खास वैशिष्ट्ये म्हणजे या कारवर गॅस हल्ला किंवा केमिकल हल्ला केल्यानंतरही या कारला काहीच हानी होत नाही. या कारमध्ये बसलेली व्यक्ती बॉम्ब आणि गोळीबारपासून सुरक्षित राहते. Range Rover Sentinel ला जगातील सर्वात शक्तीशाली कार म्हटले जाते. याच कारणामुळे यात Jaguar सोर्स्ड 5.0-लीटर, सुपरचार्ज्ड V8 इंजिन दिले आहे. जे 375bhp चे मॅक्सिमम पॉवर आणि 508Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.

पीएम मोदी यांची Range Rover Sentinel वेगात तुफान आहे. ही कार फक्त ५.३ सेकंदात १०० किमी प्रति तास वेग पकडते. यात २१८ किमी प्रति तासची टॉप स्पीड मिळते. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, पीएम मोदी यांच्या Range Rover Sentinel ची किंमत १० ते १५ कोटी रुपये दरम्यान आहे. यात पीएम मोदी यांच्या सुरक्षा आणि पसंतीनुसार, अनेक फीचर्सला कस्टमाइज करण्यात आले आहे.

Range Rover ची मालकी टाटा मोटर्सकडे आहे. जी एक स्वदेशी कंपनी आहे. या कारच्या सुरक्षेपासून लग्झरी फीचर्सपर्यंत सर्व जबाबदारी स्वदेशी कंपनीकडे आहे. यावर जितका खर्च केला जातो तो भारतीय कंपनीच्या खात्यात जातो.

महत्वाच्या बातम्या
Road hipnosis : रोड हिप्नोसिसमुळे झाला विनायक मेटेंचा अपघात? त्यापासून बचाव कसा करायचा? वाचा सविस्तर..
आमदार संतोष बांगर संतापले, शिवीगाळ करत थेट लगावली कानशिलात, व्हिडीओ व्हायरल
Karan Mehra: आता ‘ही’ अभिनेत्री सांगणार करण मेहराबद्दलचे संपुर्ण सत्य, निशा रावलच्या विरोधात देणार साक्ष
Aamir Khan: लाल सिंग चड्ढा प्लॉप झाल्यानंतर आमिरचे टेन्शन वाढले, डिस्ट्रीब्युटर्सने मागितली नुकसान भरपाई

ताज्या बातम्या आरोग्य राज्य

Join WhatsApp

Join Now