राष्ट्रवादीत होते तेव्हा बैलगाडीभरून पुरावे देत भ्रष्टाचाराचे आरोप; भाजपमध्ये प्रवेश करताच केलं मंत्री

एकेकाळी शिवसेना-भाजप युतीने त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या डॉ. विजयकुमार गावितांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्याच विजयकुमार गावित यांना शिंदे सरकारमध्ये भाजपने कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. (When he was in NCP, he gave proofs of corruption; Minister did as soon as he joined BJP)

विजयकुमार गावित यांना भाजपमधील अंतर्गत एका गटाचा विरोध असताना भाजपकडून त्यांना मंत्रीपद मिळाले. या गोष्टीमुळे मतदारसंघातील गावितांच्या कार्यकर्त्यांच्या मनोबल उंचावले आहे.

सलग सहा टर्म नंदुरबारमधून निवडून येणाऱ्या विजयकुमार गावित यांची ताकद ओळखूनच देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिल्याचे बोलले जाते. यामुळे भाजप तळागाळात पोहोचण्यास आणि पक्षाचे संघटन जिल्हा नंदुरबारमध्ये मजबूत होण्यास त्यामुळे मदत होईल असा दूरचा विचार यामागे असू शकतो.

डॉ. विजयकुमार गावित नंदुरबारमध्ये १९९५ पासून ६ वेळा निवडून आले आहेत. विजयकुमार गावित यांची नंदुरबार जिल्ह्यावर चांगली ताकद आहे. अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर १९९ पासून राष्ट्रवादीत त्यांनी पुढील राजकीय कारकीर्द सुरू केली.

विजयकुमार गावित यांची राजकीय प्रतिभा पाहून शरद पवारांनी त्यांना अनेक खात्यांवर कॅबिनेट मंत्रीपदी काम करण्याची संधी दिली होती. त्यानंतर आदिवासी कल्याण योजनेच्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झाला. जिल्ह्यात छापेमारी झाली.

संजय गांधी निराधार योजनेत सुद्धा त्यांचे नाव आले. या सगळ्यामुळे गावित यांच्या राजकीय प्रवासाला काहीसा ब्रेक लागला. त्यांची मुलगी हिना गावित त्यांनी २०१४ ला भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर विजयकुमार गावित सुद्धा भाजपमध्ये गेले.

महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदे सामान्य शिवसैनिक होते, मग त्यांच्याकडे बंड करायला एवढा पैसा कुठून आला? वारकऱ्यांचा सवाल
मोदींकडे ना स्वतः च्या मालकीची गाडी, ना शेअर्स; जाणून घ्या एकूण संपत्ती किती?
“एकनाथ शिंदेंच्या मंत्रीमंडळात महीला व बालकल्याण खाते संजय राठोड सांभाळतील”