Uma maheshwari death | आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते एनटी रामाराव यांच्या कन्या कंथामनेनी उमा माहेश्वरी यांचे सोमवारी निधन झाले. तेलगू देसम पार्टी (टीडीपी) चे संस्थापक एनटी रामाराव यांच्या 12 मुलांपैकी त्या सर्वात लहान होत्या. त्यांनी आजारपणानंतर हैदराबादमधील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
उमा माहेश्वरी यांच्या निधनाने नंदामुरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चार बहिणींमध्ये त्या सर्वात लहान होत्या. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दग्गुबती पुरंदेश्वरी आणि टीडीपी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची पत्नी नारा भुवनेश्वरी ही त्यांची बहीण आहे.
चंद्राबाबू नायडू, त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि कुटुंबातील इतर सदस्य माहेश्वरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. सूत्रांनी सांगितले की, उमा माहेश्वरी यांचे भाऊ, लोकप्रिय टॉलिवूड अभिनेता आणि टीडीपीचे आमदार एन. बाळकृष्ण तसेच परदेशात इतर कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
एनटी रामाराव हे तेलगू भाषेतील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध होते. आधी ते अभिनेते होते मग ते राजकारणी झाले. 1982 मध्ये त्यांनी तेलुगू स्वाभिमानचा नारा देत टीडीपीची स्थापना केली आणि नऊ महिन्यांत पक्षाला सत्तेवर आणून एक प्रकारचा विक्रम केला.
त्यांनी तत्कालीन अविभाजित आंध्र प्रदेशातील काँग्रेसची सत्ता संपवली. त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची सत्ता गेली अन् काही महिन्यांनी 1996 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. एनटीआर यांना 12 मुले होती – आठ मुले आणि चार मुली.
उमा माहेश्वरी या चार मुलींमध्ये सर्वात लहान होत्या. नुकतेच उमा माहेश्वरी यांच्या मुलीच्या लग्नात अनेक कुटुंबीय एकत्र आले होते. अभिनेते आणि माजी मंत्री एन. हरिकृष्णासह एनटीआर यांच्या तीन मुलांचे यापूर्वीच निधन झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde: दिघेसाहेब एकदा तुम्ही भर रस्त्यात राजनचे कानशील रंगवले होते..; विचारेंच्या पत्रानंतर दिघेंच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचे पत्र व्हायरल
Sanjay Raut: पत्राचाळ प्रकरणात संबित पात्रांनी केली राऊतांची पोलखोल; थेट आकडेवारी देत केला मोठा गौप्यस्फोट
‘तुम्हाला येऊन ८ वर्ष झाली, नवीन सूनबाईपण एवढ्या वेळात शिकून जबाबदारी घेते
Birthday Party: धक्कादायक! केक कापताना मेणबत्तीचा झाला स्फोट, मुलाचा गाल अन् जीभ भाजली, प्रकृती गंभीर