राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणात सध्या राऊतांची त्यांच्या भांडूपमधल्या मैत्री या घरी चौकशी सुरू आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा आणि बंधू सुनील यांच्यासह ही चौकशी सुरू आहे. यामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संजय राऊतांवरच्या कारवाईवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवसेना देखील आक्रमक झाली आहे.
याचबरोबर ईडीच्या कारवाईनंतर राऊतांनी ट्वीट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मी शिवसेना सोडणार नाही, असं मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ही खोटी कारवाई आहे. या प्रकरणातील पुरावे देखील खोटे आहेत. मी शिवसेना सोडणार नाही आणि मरेन पण शरण जाणार नाही,’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
राऊत यांनी म्हंटलं आहे की, ‘कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. जय महाराष्ट्र, असं ट्वीट ईडीची चौकशी सुरू असतानाच राऊत यांनी केलंय.
कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय..
मी शिवसेनेसाठी लढत राहीन.— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022
दरम्यान, आज (रविवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीची टीम दाखल झाली. राऊत यांच्यावर पत्राचाळ प्रकरणात 1039 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
खोटी कारवाई..
खोटे पुरावे
मी शिवसेना सोडणार नाही..
मरेन पण शरण जाणार नाही
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022