Share

एकनाथ शिंदे गटातील 37 बंडखोर आमदारांचा पराभव होणार; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय गोंधळ सुरूच आहे. राज्यातील राजकीय वर्तुळात उलथापालथ सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदारांमध्ये जोरदार पलटवार सुरू झाला आहे. शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची पुढील राजकीय भूमिका कशी असणार? याकडे सर्वांचेलक्ष लागले आहे.

सध्या शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी किती आमदार पुन्हा निवडून येणार, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी बंडखोर आमदार पुन्हा निवडून येणार नाही, असा दावा केला आहे.

तर दुसरीकडे  आगामी विधानसभा निवडणुकीत २०० जागा निवडून आणू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसे जर झाले नाही मी शेती करायला निघून जाईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारणाचे चित्र कसे उमटणार? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.

अशातच एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतचे ट्विट ज्येष्ठ विचारवंत हरी नरके (Hari Narke) यांनीही केले आहेशिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी बहुतेक आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत, असं या सर्वेक्षण आढळून आल्याचे नरके यांनी म्हटलं आहे.

वाचा नरके यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हंटलं आहे?
नरके यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्टच म्हंटलं आहे की, ‘माझे एक निवडणूक सर्व्हे करणारे मित्र आहेत. त्यांचे अभ्यास 95% पर्यंत अचूक असल्याचे अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध झालेले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी शिंदे सेनेच्या 40 आमदारांच्या मतदारसंघात नमुना सर्व्हे केले असता 40 पैकी 37 आमदार पराभूत होतील. म्हणजे मुख्यमंत्री शिंदेसाहेब राजकारण सोडणार तर….’

आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार का?
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे संबंधित याचिका १५ व्या क्रमांकावर सुनावणीसाठी येणार असून शिवसेना नेत्यांच्या याचिकांवर अद्याप नोटिसा निघालेल्या नाहीत. पण सर्व प्रतिवादींतर्फे बाजू मांडण्यासाठी वकील उपस्थित राहिल्यास सुनावणी घेतली जाऊ शकते. मात्र प्रतिज्ञापत्र व त्यावर अन्य प्रतिवादींना उत्तरे सादर करण्यासाठी न्यायालयाकडून काही आठवडय़ांचा वेळ दिला जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या
हातातले शिवबंधन सरणावर गेल्यावरच सुटेल; पक्ष सोडतानाही शिवसेना नेत्याची भावूक प्रतिक्रिया
तुमच्या ‘या’ सवयींमुळे वयाच्या आधीच तुम्ही दिसू शकता म्हातारे; वाचा त्यावरील उपाय …
शाहरूख आणि काजोलबद्दल उडाली ‘ही’ अफवा, ऐकल्यावर अजय देवगणलाही लागेल मिर्ची
सोशल मीडियाचा वापर करत ‘या’ चार तरुणांनी उलथवून टाकली श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंबाची सत्ता

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now