सध्या राज्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. धरणं, नद्या भरत चालल्या असून त्यांच्या पाण्याची पातळी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासन लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देत आहे. तसेच राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (junnar man slept away in rainwater)
पावसाच्या पाण्यामुळे आपल्या जीवाला धोका असू शकतो, हे माहित असतानाही काही लोक बाहेर पडत आहे. अशात अनेक धक्कादायक व्हिडिओही समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वीच भूशी धरणात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती, ही घटना ताजी असतानाच आता जुन्नरमधून एक बातमी समोर आली आहे.
जुन्नरमधील गोद्रे गावासाठी पूल मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्याचे काम अजूनही सुरु झालेले नाही. अशात तिथल्या नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे तिथून प्रवास करणे धोक्याचे आहे. असे असतानाही काही नागरिक हे जीव हातात घेऊन इथून प्रवास करताना दिसून येत आहे.
पुणे जिले के जुन्नर में एक शख्स बारिश के पानी की तेज धार में बह गया..
घटना आज दोपहर की..#Maharashtra #Monsoon2022 pic.twitter.com/OrNvh0UHvR
— Vivek Gupta (@imvivekgupta) July 13, 2022
बुधवारी दुपारच्या सुमारात गोद्रे गावात एक व्यक्ती जात होता. पण तो जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे तो त्यात वाहून गेला आहे. त्याला पोहता येत असल्यामुळे काही अंतरानंतर तो सुखरुप बाहेर निघाला. पण या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो एका कठड्यावर चढताना दिसत असतो. पण काहीही केल्या त्याला ते शक्य होत नाही. त्याचवेळी तिथल्या पाण्याची पातळी वाढते. पाण्याचा जोर इतका असतो की ते पाणी त्याला वाहून नेते. पण नंतर आपल्याला दिसते, तो काही अंतरानंतर त्या पाण्यातून बाहेर येतो.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच भूशी डॅममध्ये अशीच एक घटना घडली होती. साहिल सरोज नावाचा तरुण भूशी डॅममध्ये बुडाला होता. साहिल हा पावसाळ्यात फिरण्यासाठी आपल्या मित्रांसोबत आला होता. भूशी धरणाच्या पाठीमागे असलेला धबधब्याजवळ तो उभा होता. पण त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो थेट धरणात पडला.
महत्वाच्या बातम्या-
अथिया शेट्टी आणि केएल राहूल लवकरच करणार लग्न? सुनील शेट्टी म्हणाला…
शिंदे सरकारने आपला शब्द पाळला, राज्यातील पेट्रोल ५ आणि डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
लंडनच्या रस्त्यावर पाठकबाईंनी पकडली राणादाची कॉलर, व्हायरल व्हिडिओची चर्चा