शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतची एक आठवण सांगितली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे शब्द आठवताच दीपक केसरकरांचे डोळे भरून आल्याच पाहायला मिळाले. पहिल्याच दीपक केसरकर एवढे भावूक झाल्याच पाहायला मिळालं.
वाचा नेमकं घडलं काय..?
नाट्यमय घडामोडीनंतर तब्बल महिन्याभराने आपल्या सावंतवाडी मतदारसंघात केसरकर काल दाखल झाले. कार्यकर्त्यांनी जोरदार त्यांचे मतदारसंघात स्वागत केले. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,’ ‘शिवसेना जिंदाबाद,’ अशा घोषणा केसरकर यांचे सावंतवाडीत स्वागत करण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना केसरकर काहीचे भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी बोलताना केसरकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतचा संवाद सांगितला आहे. केसरकर यांनी सांगितलं आहे की, ‘मी माझ्या मतदारसंघात जाणार असल्याचं जेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं.’
‘तेव्हा आवश्यकता असेल तर मीही तुमच्यासोबत येतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. मी अजून असा दिलदार माणूस बघितला नाही. आपली ज्यानं बाजू मांडली त्याच्याबरोबर मी सुद्धा त्याच्या मतदारसंघामध्ये गेलं पाहिजे, अशी जर भावना कुठला मुख्यमंत्री ठेवत असतील तर ते महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकतो,’ असं केसरकर म्हणाले.
विशेष बाब म्हणजे हे बोलताना केसरकर यांना हुंदका आवरता आला नसल्याचंही पाहायला मिळालं. पहिल्यांदाच ते एवढे भावूक झाल्याच निदर्शनास आलं. दरम्यान, राज्यात जेव्हा राजकीय नाट्यमय घडामोडी घडत होत्या. तेव्हा शिंदे गटाचे प्रवक्ते या नात्याने केसरकर यांनी चांगल्या प्रकारे भूमिका बजावली होती.
बंडाच्या काळात एकनाथ शिंदे हे समोर येऊन स्वत: बाजू मांडताना पाहायला नाही मिळाले. मात्र पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली केसरकर यांच्या माध्यमातून समोर येत होत्या. या काळात शिंदे यांना 40 आमदारांसोबतच केसरकर यांची मोलाची साथ मिळाली. केसरकर हे शिवसेना आणि शिंदे गट यातील महत्त्वाचा दुवा होते.
महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?