‘ती’ गोष्ट कानावर घालण्यासाठी मी शिंदेंना भेटलो; आव्हाडांनी सांगितले मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचे कारण

शिवसेनेसोबत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन त्यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर नवीन सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहे. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहे. (jitendra awhad talk about eknath shinde)

आमदारांपाठोपाठ आता खासदारही शिंदे गटात सामील होण्याची चर्चा आहे. अशातच एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला दांडी मारली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या या भेटीमुळे चर्चांणा उधाण आले आहे. जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी अग्रदुत बंगल्यावर पोहोचले होते. जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट का घेतली याबद्दल खुद्द आव्हाडांनीच सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या यशवंत चव्हाण सेंटरमध्ये एक बैठक आयोजित केली होती. तिथे सर्व नेते हजर होते. पण ही बैठक सुरु असताना जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहचले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात त्यांचीच चर्चा रंगली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांची माझी भेट झाली नव्हती. माझ्या मतदार संघात जो बायपास आहे, त्याच्या सळया बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो. ती बाब त्यांच्या कानावर घालण्यासाठी मी तिथे गेलो होतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

तसेच त्यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशी मागणी मी त्यांना केली आहे. विकास कामांसाठी मी त्यांची भेट घेतली आहे. मी त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. पण सविस्तर भेटीची वेळ कधी मिळेल माहिती नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर करा ‘हे’ घरगुती उपाय; दोन दिवसात पडेल फरक
स्मिता तांबेच्या मुलीचं झालं बारसं, नवऱ्यानेच शोधलं मुलीसाठी गोंडस नाव, तुम्हालाही आवडेल
VIDEO: भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ महिलेने केला व्हायरल, गंभीर आरोप करत म्हणाली..