राजनाथ सिंग यांच्या ‘अस्सलाम वालेकुम’ला उद्धव ठाकरेंनी दिले ‘जय श्री राम’ने उत्तर, वाचा किस्सा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्रीवर माजी आमदारांची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी माजी आमदारांना तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या आहे. पुन्हा एकदा लढायचं आहे, संघर्षाची तयारी ठेवा अशा सुचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहे. (Uddhav thackeray talk about rajnath singh)

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्याबद्दलचा एक किस्साही सांगितला आहे. ते म्हणाले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूला यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

राजनाथ सिंग यांनी जेव्हा उद्धव ठाकरेंना फोन केला, तेव्हा त्यांच्या बोलण्यावरुन ठाकरे भडकले होते. कारण त्यांनी सुरुवातच तशी केली होती. ठाकरे म्हणाले, राजनाथ सिंह यांनी मला फोन केला आणि ‘अस्सलाम वालेकुम’ म्हटले. यावर मी आक्षेप घेत म्हटले की, आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. मी त्यांना जयश्री राम म्हणून उत्तर दिले आणि त्यांच्यासोबत पुढचं बोलणं केलं.

तसेच राजनाथ सिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशी भाषा वापरण्यात आल्याचे पाहून मला आश्‍चर्य वाटल्याचेही उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावल्याचे म्हटले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. पण एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ते सरकार पडले आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेनेवर हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोप होत आहे. हिंदुत्वाशी तडजोड केल्याबद्दल भाजपकडून अनेकवेळा शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

भाजपच्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी तडजोड न करण्याबाबत अनेकदा वक्तव्ये केली आहे. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर संभाजी नगर करण्याचा ठराव मंजूर केला होता.

महत्वाच्या बातम्या-
महिन्याला ४ वेळा ATM मधून पैसै काढल्यावर पुढच्यावेळी १७३ रुपये कट होणार? वाचा यामागचे सत्य
‘उद्धवसाहेबांच्या जागी दुसरा कोण असता तर रक्ताचे पाट वाहिले असते’, आमदाराचे मोठे वक्तव्य
ठाकरेंना आव्हान देण्यासाठी संतोष बांगर करत होते शक्तीप्रदर्शन, शिवसैनिकांनी दिला दणका