राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे देखील चांगलीच सक्रिय झाली आहे. सध्या राज्यात ठाकरे सरकार सत्तेपासून दूर झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला यश मिळालं आहे. यामुळे भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे.
तर दुसरीकडे मनसे देखील आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलीच मैदानात उतरली आहे. १३ जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं होतं.
मात्र अशातच एक वेगळी बातमी मनसेनेच्या गोटातून येत आहे. उद्याच्या मेळाव्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीचं पत्र काढत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. उद्या होणारा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहितीही पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांठी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे पत्र.#MNSAdhikrut pic.twitter.com/oDcj7AKehu
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 12, 2022
वाचा काय म्हंटलं आहे राज ठाकरेंनी पत्रात..?
‘उद्या एका मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हाला सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे,’असं राज म्हणाले आहेत.
पुढे राज यांनी आपल्या पत्रात म्हंटलं आहे की, “एक लक्षात घ्या की असा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करु नका. अर्थात असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं.”
दरम्यान, ‘आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच थोडा पावसाचा अंदाज घेऊन तुम्हा सर्वांना कळवली जाईलच, असं पत्रातून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, तुम्ही स्वत:ची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही पण…’; उद्धव ठाकरेंनी पुण्यातील शिवसैनिकांना घातली भावनिक साद
कुठे निघालो होतो हे पत्नीलाही सांगितलं नव्हतं, मात्र.., शंभूराजे देसाईंनी सांगितला बंडखोरीचा ‘तो’ किस्सा
ट्रकचा हॉर्न वाजताच १० ते १५ नागोबा घाटातच लागले डुलायला; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
‘मोदींच्या इशाऱ्याची वाट पाहतोय, माझा राजीनामा माझ्या खिशातच आहे’, राज्यपाल संतापले