कुठे निघालो होतो हे पत्नीलाही सांगितलं नव्हतं, मात्र.., शंभूराजे देसाईंनी सांगितला बंडखोरीचा ‘तो’ किस्सा

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचे धक्के अजूनही शिवसेनेला बसत आहेत. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अख्ख ठाकरे सरकार कोसळलं. मात्र हे बंड नेमकं घडलं कसं? हे नियोजित बंड होतं का? अचानक तब्बल 40 आमदारांनी सत्तेत असूनही देखील बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कसा? असे अनेक प्रश्न आजही जनतेच्या मनात आहेत.

याच सर्व प्रश्नांचा उलगडा शिंदे गटात सामील असलेल्या आमदार शंभूराज देसाईंनी केला आहे. माध्यमांशी बोलताना देसाईंनी सांगितलं आहे की, नेमकं मी कुठे निघालो होते, हे पत्नीलाही सांगितले नव्हत. मात्र दुसऱ्या दिवशी बातम्या पाहिल्यानंतर सौभाग्यवतींने ओळखले.

की मी दोन दिवस नॉटरिचेबल आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांसोबत कुठेतरी बाहेर चाललेत, असं देसाई यांनी सांगितलं. ‘आम्हाला सर्वांना विश्वास होता, की शिंदे साहेबांसोबत चाललो आहे. ते आपल्याला कसलीही अडचण होऊ देणार नाही. सगळी व्यवस्था चांगली होती, असंही देसाई यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना देसाई यांनी सांगितलं की, ‘शिंदे यांनी आदेश दिले, त्यानुसार आम्ही सर्वजण बाहेर पडलो. मात्र कुठे चाललो कुठल्यादिशेने चाललोय याची काहीही कल्पना नव्हती.’ वेगवेगळ्या गाड्यांमधून आम्ही निघालो. मात्र महाराष्ट्र-गुजरात बॉर्डला नाकाबंदी होती, तरीही आम्ही तेथून कसतरी निसटलो, असा देसाई यांनी सांगितलं.

दरम्यान, आम्ही पहिल्यांदा सुरतला गेलो आणि त्यानंतर गुवाहाटीला गेलो. सर्वजण हसून खेळून राहिलो. मात्र मला सर्वात जास्त गुवाहाटी हे ठिकाण आवडलं. तेथील माणसं खूप नम्र आहेत, तेथे राहायला चांगल वाटलं असं शंभूराज देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितला.

त्यानंतर आम्ही सर्वजण कामाख्या देवीच्या दर्शना गेलो होतो. तेथे गेल्यानंतर मी शिंदे साहेबांना म्हणालो की, मुख्यमंत्री झाल्यावर वहिनींना घेऊन तुम्ही परत या देवीच्या दर्शनासाठी जा. त्यावर ते म्हणाले की, सर्व ५० आमदारांना घेऊन जाऊ, असं म्हणत त्यांनी दिलदारपणा दाखवला असल्याच देसाई यांनी म्हंटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?