शिंदे सरकारमध्ये कोणा-कोणाला मिळणार मंत्रिपदं; मुख्यमंत्र्यांनी स्वतःच ट्विट करत केला मोठा खुलासा

काल एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरवाला एकूण १६४ सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी देखील १६४ सदस्यांनी मतदान केलं होते.

गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

मात्र अजूनही एकनाथ शिंदे यांची लढाई संपलेली नाहीये. शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेले 40 हून अधिक आमदार आता पदांसाठी सरसावले आहेत. शिंदे गटात आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.सत्ताधारी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता आमदारांच्या अपेक्षाही वाढल्या आहे.

यामुळे आता शिंदे यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. पदांसाठी आमदार नाराज होऊ नये यासाठी शिंदे यांना जातीने आता यामध्ये लक्ष घालावे लागणार आहे. मंत्रिमंडळ विस्तराबाबत आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

“भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका,’ असं आवाहन खुद्द मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांनी ट्विटद्वारे केलं आहे.याचबरोबर पुढील ट्विटमध्ये शिंदे यांनी म्हंटलं आहे की, ‘वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस”, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले

महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीस शरद पवारांसोबतही करणार खेळी
पैलवानांच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्तीगीर संघटनेची मोठी कारवाई, शरद पवारांना धक्का
मविआ सरकार पडताच शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; सूड घ्यायला सुरवात?
उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवून सगळी जबाबदारी एकनाथ शिंदेंला दिली त्याचा हा परिणाम- शरद पवार