शिवसेनेचे जेष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली होती. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली अशा बातम्या समोर आल्या होत्या. पण त्यांची हकालपट्टी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे. (shivsena apololise shivajirao adhalrao patil)
शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे उपनेते आहे, तसेच ते शिरूर मतदार संघाचे माजी खासदार सुद्धा आहे. त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती, अशी बातमी समोर आली होती. त्यानंतर आता शिवसेनेने ही बातमी दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील हे अजूनही शिवसेनेत कार्यरत आहे. सामना वृत्तपत्रात छापण्यात आलेली बातमी अनवधनाने प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून नक्की काय झालं आहे? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्या गटात सामील होत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. सध्या बंडखोर आमदारांवर कारवाईचे सत्र सुरु असून सामना या वृत्तपत्रात आज शिवाजीराव आढळराव पाटलांच्या हकालपट्टीची बातमी आली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

त्यानंतर आता शिवसेनेने एक पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये. ३ जुलै २०२२ रोजी सामना दैनिकात आलेली बातमी ही अनवधनाने छापण्यात आलेली असून श्री. शिवाजीराव आढळराव-पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे, असे म्हटलेले आहे.
दरम्यान, शिवसेनेशी बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पोस्टर शेअर करुन एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या होत्या. पण त्यांनी पक्षप्रमुखांचा फोटो न वापरल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली, अशी बातमी समोर आली होती. पण शिवसेनेने यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
४७ वर्षांची झालेली असतानाही सुष्मिता सेनने लग्न का केले नाही? स्वत:चा केला मोठा खुलासा, म्हणाली…
फडणवीसांसारख्या हलकट माणसावर स्वप्नातही विश्वास ठेऊ नका; फडणवीसांच्या माजी सहकाऱ्यानेच केला भांडाफोड
“देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहे”