मुख्यमंत्री शिंदे अॅक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादीच्या 600 कोटींच्या कामांना लावला ब्रेक, वाचा काय घेतला निर्णय?

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा कारभार हाती घेतला आहे. शिंदे यांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांनी आता छगन भुजबळांना जबर धक्का दिला आहे. शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे.

याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी सवाल उपस्थित करत चर्चा केली आहे. ठाकरे सरकारच्या काळात कार्यसमितीची बैठक घेऊन घाईघाईने 567 कोटींचं काम मंजूर करण्यात आलं होतं. यालाच अनुसरून शिंदे यांनी म्हंटलं आहे की, ‘घाईघाईत कामांना मंजुरी कशासाठी ?.’

असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावत शिंदे यांनी छगन भुजबळ यांना धक्का दिला आहे. आता पुढेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणते निर्णय घेणार? ठाकरे सरकारमधील कोणत्या कामांना ब्रेक लावणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला देखील जबर धक्का बसला आहे. पहिल्याच बैठकीत शिंदे सरकारनं ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करत पुन्हा एकदा मेट्रो 3 चे कारशेड हे आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

भाजपचे सरकार सत्तेत येताच मेट्रो शेड पुन्हा एकदा आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, माझा राग मुंबईवर काढू नको, आरेचा आग्रह उगाच रेटू नका, त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होईल. मेट्रो शेडसाठी कांजूरचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये माझा अहंकार नाही.

माझा चेहरा आज तुम्हाला पहिल्यांदा पडलेला दिसत असेल. मला दुख झालंय, माझ्या पाठीत खंजीर खुपसलीये. आता तर वरतीही तुमचंच सरकार आहे त्यामुळे मुंबईची जमीन मुंबईच्या हितासाठी वापरा. कांजूरला गेल्यावर ती मेट्रो थेट बदलापूरपर्यंत जाईल, असा विचार करून तो निर्णय दिला आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-
अखेर शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; वाचा कॅबिनेटमध्ये कुणाची लागणार वर्णी
‘या’ गंभीर आजारमुळे श्रृती हसन होतेय लठ्ठ, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती; ‘अशी’ झालीये अवस्था
‘माझ्यावर रोज २० ते २५ जण बलात्कार करतात, आई- वडीलही त्यांना साथ देतात; मुलीचा व्हिडीओतून आरोप
अखेर तो दिवस आलाच! दिनेश कार्तिकला मिळाले टीम इंडियाचे टी-20 कर्णधारपद, हार्दिक पंड्याला डच्चू