बंडखोरी करत अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
शिंदे यांच्या बंडखोरीमुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मात्र अजूनही एकनाथ शिंदे यांची लढाई संपलेली नाहीये. शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेले 40 हून अधिक आमदार आता पदांसाठी सरसावले आहेत. शिंदे गटात आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.
सत्ताधारी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता आमदारांच्या अपेक्षाही वाढल्या आहे. यामुळे आता शिंदे यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. पदांसाठी आमदार नाराज होऊ नये यासाठी शिंदे यांना जातीने आता यामध्ये लक्ष घालावे लागणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बच्चू कडू यांच्याजवळ राज्यमंत्रिपद होतं. मात्र आता बच्चू कडू यांनी कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी मागणी केल्याची चर्चा आहे. जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास यांसारखी मंत्रिपद मिळावं अशी बच्चू कडूंची मागणी असल्याच बोललं जातं आहे.
दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यात अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांनी मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला आहे. एका जिल्ह्यात दोन मंत्रिपद दिलं जात असल्यानं शिरसाट नाराज झाले असल्याच आता बोललं जातं आहे.
दरम्यान, दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता राज्यात शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत ते आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता.
महत्वाच्या बातम्या
अद्भूत! तब्बल ६० वर्षांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घडला चमत्कार, फोटो पाहून थक्क व्हाल
तुझ्या घरासमोर २०० बिहारी उभे करेल, चाकू खूपसून तुला मारून टाकेल; अभिनेत्रीला नोकराची धमकी
फडणवीसांसह ब्राह्मण नेत्यांचं भाजपमध्ये खच्चीकरण; राजकीय आखाड्यात ब्राह्मण महासंघाची उडी
IPL गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूला रोहित शर्माने दिली संधी, पहिल्यांदाच दिसणार भारतीय संघात