शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे आपल्या वेळ देत नसल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या.
यामुळे शिवसेनेतील नाराजी चव्हाट्यावर आली. याचबरोबर शिवसैनिकांना पक्षाकडून मिळणारी वागणूक, ठराविक नेत्यांचा मातोश्रीवर प्रवेश यामुळे अनेक नेते हे नाराज असल्याच या काळात समोर आलं. अशातच आता एका पत्राची जोरदार चर्चा सध्या शिवसेनेच्या गोटात सुरू आहे.
बीडचे तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी पत्राद्वारे आपली खंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. मुळूक यांनी आपल्या नाराजीचे पत्र थेट उद्धव ठाकरेंना पाठवलं आहे. ‘कोरोनाने वडील वारले होते, तेव्हा तुम्ही माझे जिल्हाप्रमुखपद काढले,’ असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
वाचा काय लिहिले आहे पत्रात..?
मी गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसैनिक म्हणून एकनिष्ठेने काम करत आहे. मात्र कोरोनाने माझे वडील वारलेले होते, अशा दुःखद प्रसंगात धीर मिळण्याऐवजी माझे शिवसेना जिल्हा प्रमुखपद काढून घेण्यात आले, अशी खदखद सचिन मुळूक यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे.
आपल्या कुटुंबात घडलेल्या दुःखद घटना काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना कळूच दिल्या नाहीत असे त्यांनी या पात्रात म्हटले आहे. माझ्याबाबत व्यक्तिगत सूड भावनेतून केलेला प्रकार इतर शिवसैनिकांबाबत घडू नये असेही मुळूक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, समजा आपल्या कुटुंबाबाबत घडलेला प्रकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळला असता तर त्यांनी निश्चितीच सांत्वन करून धीर दिला असता असेही या पात्रात म्ह्टले आहे. यावर अद्याप शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आलेल्या नाहीये. उद्धव ठाकरेंनी देखील भाष्य केलेलं नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या
बातमी विद्यार्थ्यांसाठी! बारावीनंतर ‘हे’ कोर्सेस करा, नोकरीची १०० टक्के खात्री
आलिया-दीपिका नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे रणबीर कपूरची फेव्हरेट, म्हणाला, तिच्यासोबत रोमान्स…
‘त्या’ पत्राने घात केला अन् शिकारी स्वतःच जाळ्यात अडकला; वाचा फडणवीसांबद्दल नेमकं काय घडलं
KGF मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात, कारला ट्रकने दिली धडक, पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात