”फडणवीसांना अपमानित करण्यासाठीच केंद्राने त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं”

राज्यातील राजकीय नाट्याचा काल शेवट झाला असं म्हणता येईल. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुरूवातीला त्यांनी आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार असल्याचं सांगितलं होतं पण नंतर केंद्रातून त्यांना सुचना आल्या आणि त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याचं ठरवलं.

काहींना हा देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा असल्याचं वाटलं तर काहींनी केंद्रीय नेत्यांचेच तसे आदेश आहेत असं सांगितलं आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना अपमानित करण्यासाठीच त्यांना मुख्यमंत्रीपद न देता उपमुख्यमंत्री पद दिले गेले आहे.

भाजपातील केंद्रिय स्तरावरील नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करण्यासाठी घेण्यात आला आहे असं विरोधक आणि बरेच नेते म्हणत आहेत. त्यामुळे असंही बोललं जात आहे की केंद्रिय नेतृत्व देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे.

गुरूवारी शरद पवारांनीही यावर भाष्य केलं होतं की, त्यांचा पडलेला चेहरा पाहून हा निर्णय त्यांच्या मनाविरूद्ध झाला असे वाटते. पण पक्षाचे आदेश फडणवीसांनी पाळले त्यामुळे पवारांनी त्यांचं कौतुकही केलं होतं. पण आता प्रकाश आंबेडकरांनी थेट सांगितलं की, केंद्राने फडणवीसांनी अपमानित करण्याच्या हेतून हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फडणवीसांना मंत्रिमंडळात सहभागी व्हायचं नव्हतं.  त्यांना येणाऱ्या काळात पक्षवाढीचं काम करायचं होतं. त्या अनुशंगाने माध्यमात चर्चाही सुरू होती. पण काही वेळातच त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. केंद्राकडून अशा सुचनाही आल्या. त्यामुळे खरंच भाजपने त्यांना अपमानित करण्यासाठी हे केलं आहे का? यामागे भाजपचा काय प्लॅन आहे? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना भवनात आले होते. ते म्हणाले की, भाजपने शिवसैनिकाला जरी मुख्यमंत्री केलं असेल तरी शिवसेना त्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री मानत नाही. मात्र हे सरकार ज्यापद्धतीने स्थापन झाले ज्या पद्धतीने एका कथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्यात आलं. हेच मी अडीच वर्षांपुर्वी अमित शाह यांना सांगत होतो. जर अडीच वर्ष भाजपाचा अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर महाविकास आघाडी जन्मच झाला नसता.

महत्वाच्या बातम्या
मातोश्रीला कधी भेट देणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगीतली वेळ…
…आणि देवेंद्र फडणवीसांना अश्रु अनावर; वाचा ‘सागर’ बंगल्यावर नेमकं घडलं काय?
‘…तोपर्यंत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर ठेवलं जाईल,’ संजय राऊतांनी केलं भाकित
आलिया-दीपिका नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे रणबीर कपूरची फेव्हरेट, म्हणाला, तिच्यासोबत रोमान्स…