Share

उद्धव ठाकरेंचे निरोपाचे शेवटचं भाषण तुमच्या पोरा बाळांना दाखवा, कारण…

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते. हे महाविकास आघाडीसाठी धोक्याचे असल्याचे म्हटले जात होते. असे असतानाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी बुधवारी लाईव्ह येऊन राजीनाम्याची घोषणा केली होती. (sanjay avate talk about uddhav thackeray speech)

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्रिपदासोबतच त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानवेळी उद्धव ठाकरे यांनी खुप भावूक करणारे भाषण केले होते. त्यांच्या भाषणाचीही चर्चा होत आहे.

माझ्याबरोबर फक्त चारमंत्री होते, असे उद्धव ठाकरे यांनी भाषणात म्हटले होते. उद्धव ठाकरे यांचे हे शेवटचे भाषण खुपच प्रभावी ठरलं आहे. या भाषणावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. लेखक, विचारवंत यांच्यासह सोशल मीडियावरही उद्धव ठाकरेंच्या भाषणावर लिहिलं जात आहे.

अशात जेष्ठ पत्रकार आणि संपादक संजय आवटे यांनी एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट राजकारणापेक्षा जरा वेगळी आहे. त्यामुळे ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. पाहूया नक्की त्यांनी काय लिहिलं आहे.

फेसबूक पोस्ट-
उद्धव ठाकरेंच्या निरोपाचं आजचं भाषण तुमच्या पोरा-बाळांना दाखवा. पक्ष वगैरे विसरा. पण, आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात. आपल्या पुढ्यातलं काही हिरावून नेलं जातं. आपलीच माणसं आपल्याला दगा देतात. आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. आपल्याला अवमानित केलं जातं…

त्याही स्थितीत चडफड न करता, घसा ताणून न किंचाळता, निराश-विफल न होता, शिवीगाळ न करता कसं शांत राहावं, आजच्या पोरांच्या भाषेत कसं ‘कुल’ राहावं, यासाठी हे भाषण बघू द्या त्यांना. आयुष्यात कधीतरी तुमच्या मुलाबाळांना हे उपयोगी पडेल.

महत्वाच्या बातम्या-
आमचे सरकार २५ वर्षे टिकणार; देवेंद्र फडणवीस यांची गर्जना
कन्हैयालालच्या मारेकऱ्यांबाबत पोलिसांकडून धक्कादायक खुलासा, आणखी एक खून करणार होते तेवढ्यात…
ज्या अभिनेत्यावर होता मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप, तोच आता बिग बॉसमध्ये घालणार धुमाकूूळ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now