बॉलिवूड असो वा मालिका अभिनेत्रींसोबत कास्टिंग काऊचच्या अनेक घटना घडत असतात. काही अभिनेत्री या घटनांचा खुलासा करताना दिसून येतात. टीव्ही अभिनेत्री शिव्या पठानियाने कास्टिंग काऊचबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. (balshiv actress onc casting couch)
कास्टिंग काऊचची व्यथा सांगताना ती म्हणाली की, जेव्हा तिला ८ महिने कोणतेही काम मिळाले नाही, त्याचवेळी कामाच्या बदल्यात तिच्याशी संबंध ठेवण्याची मागणी करण्यात आली. पण त्यावेळी तिने निर्मात्याला खुप काही सुनावले होते आणि तिथून ती निघून गेली होती.
शिव्या पठानिया ‘बाल शिव’च्या आधी ‘एक रिश्ता पार्टनरशिप का’, ‘महादेव’ आणि ‘राधा कृष्ण’ आणि ‘राम सिया के लव कुश’ सारख्या शोमध्ये दिसून आली होती. तिने धार्मिक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, आता अभिनेत्रीच्या या खुलाशामुळे चाहत्यांना धक्काच बसला आहे.
कास्टिंग काऊचचे संपूर्ण सत्य उघड करताना शिव्या पठानियाने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, जेव्हा तिची पहिली टीव्ही मालिका ‘हमसफर’ बंद झाली तेव्हा तिच्याकडे ८ महिने कोणतेही काम नव्हते. याच काळात कामाच्या मोबदल्यात तिला संबंध बनवण्याची मागणी करण्यात आली होती. शिव्याने सांगितले की, ती सांताक्रूझमध्ये ऑडिशनसाठी गेली होती, तेव्हा तिच्यासोबत हे घडलं होतं.
शिव्याने सांगितले की, जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा तिने पाहिले की निर्माता एका खोलीत बसलेला आहे. त्याच्याशी जेव्हा शिव्या बोलली. तेव्हा तो जवळ आला आणि म्हणाला की, तुला जर एखाद्या मोठ्या जाहिरातीत काम करायचे असेल, तर माझ्यासोबत तुला झोपावे लागेल.
त्याच्या रूममध्ये लॅपटॉपवर हनुमान चालिसा वाजत होती. त्यानंतर शिव्या त्याला म्हणाली की, तुला लाज वाटत नाही. तुम्ही भजन ऐकत आहात आणि हे काय बोलताय? त्यानंतर ती तेथून निघून गेली. तिने ही घटना तिच्या सर्व मित्रांना सांगितली जेणेकरून ते त्याच्या तावडीत अडकू नये.
तसेच नंतर तिला असे कळाले की ती व्यक्ती खोटी होती. तिने सांगितले की, त्या माणसाकडे ना प्रॉडक्शन हाऊस होते ना दुसरे काही. शिव्याचा असा विश्वास आहे की कठीण काळ सर्वांसमोर येतो, पण एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे कलाकार मेहनतीतूनच या इंडस्ट्रीत जास्त काम मिळवू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
त्या नेत्यांवर थुंका, चपलांचे हार घाला…; संभाजीनगर नामांतरानंतर ‘या’ नेत्यांवर संतापले जलील
‘सरकारचे कपडे उतरले, आता लंगोट वाचवण्याचा प्रयत्न’; संभाजीनगर नामांतरावरून मनसेचा निशाणा
सावरकारांचा अपमान केल्यामुळे प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी