राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर अनेक नेते मंडळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी देखील सध्या राज्यात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर स्पष्ट शब्दात भाष्य केलं आहे. ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत त्यांच्याच लोकांनी खंजीर खुपसला असल्याच पासवान यांनी म्हंटलं आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना पासवान यांनी म्हंटलं आहे की, ‘सध्या महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या राजकीय संकटाबद्दल कोणालाही दोष देऊ नये. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत त्यांच्याच लोकांनी सुरा खुपसला आहे. ‘
‘गेल्या वर्षी माझ्यासोबतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझा विश्वासघात केला आणि एक वेगळा पक्ष स्थापन केला,’ असं म्हणत पासवान यांनी स्वत: चा अनुभव देखील यावेळी बोलताना सांगितला. हे बोलताना चिराग यांचा इशारा त्यांचेच काका म्हणजेच केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांच्यावर होता.
दरम्यान, नुकतीच बिहारमध्ये २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षानं भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाविरोधात उमेदवार दिले. विशेष बाब म्हणजे, तया निवडकीच्या प्रचारावेळी चिराग यांनी स्वत:ला पंतप्रधान मोदींचा हनुमान म्हणत होते.
तर दुसरीकडे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. शिंदे यांच्या बंडामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. ३० जून रोजी बहुमत चाचणीचे आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर आता शिंदे गट मतदानासाठी मुंबईत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बहुमत चाचणीला राष्ट्रवादीचे ‘हे’ चार आमदार गैरहजर राहणार? ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार
ठाकरे सरकार कोसळणार! महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार नव्या सरकारचा शपथविधी
त्यांनी वर्षा सोडली, आमदार सोडले पण शरद पवारांना सोडायला काही तयार नाहीत- गुलाबराव पाटील
शाहरुखलाही भेटलो होतो पण…, ६ वेळा रणजी चॅम्पियन कोचने सांगितले IPL जॉईन न करण्याचे कारण