Share

…अन् बंडखोर आमदार हाॅटेलमध्येच ढसाढसा रडू लागला; भावूक करणारा प्रसंग आला समोर

राज्यात पावसाची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आज सकाळी मुंबईमधून एक दु; खत बातमी समोर आली. मुंबईतीलकुर्ला परिसरात कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची ही ४ मजली इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली.

धक्कादायक बाब म्हणजे, कुर्ल्यातील इमारतीची संपूर्ण एक विंग कोसळली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर, घटनास्थळावर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांची तुकडी तातडीने पोहोचली. या दुर्घटनेत अंदाजे १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अनेक आमदार सध्या गुवाहाटीला आहेत. कुर्ल्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात ही दुर्घटना घडली तिथले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे सध्या इतर बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला आहेत. ही घटना कळताच कुडाळकर हे भावूक झाले.

याचबरोबर आपल्या मतदारसंघात झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर केली. माझ्या मतदारसंघात इमारत पडली आणि मी तिथे जाऊ शकत नाही म्हणून मंगेश कुडाळकरांच्या डोळ्यात पाणी आलं.

https://twitter.com/mlamangesh/status/1541645940351569921?s=20&t=O_iNGhFp8SrQmrbtDuhW1w

 

ट्विट करत कुडाळकरांनी म्हंटलं आहे की, ‘दुःखद घटना… नाईक नगर, कुर्ला (पू) येथे चार मजली इमारत  कोसळून दुर्घटना घडली. अग्निशामक , महानगरपालिका , पोलिस यंत्रणा बचाव कार्य सुरू आहे. कुटुंबियांना 1 लाख व मृत व्यक्तींना 5 लाख  मा मंत्री एकनाथ शिंदे ,  आमदार मंगेश कुडाळकर  यांच्या तर्फे करण्यात येईल.’

दरम्यान,  महाराष्ट्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचेही निर्देश दिले आहेत’, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करून देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-
उद्योगक्षेत्रातून धक्कादायक बातमी! मुकेश अंबानींनी तडकाफडकी दिला रिलायन्सचा राजीनामा
गर्लफ्रेंड असतानाही मुलींसोबत फ्लर्ट करायचा मिका सिंग, मुलांच्या नावाने सेव्ह करायचा मुलींचे नंबर
..त्यामुळे मी माझ्या प्रत्येक चित्रपटात शर्ट काढतो, इतक्या वर्षांनंतर सलमान खानने उघड केले गुपित

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now